Author: Lok Sanchar

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी  नागपूर,-  बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा…

Read More

परभणी (प्रतिनिधी) जुन्या पिढीतील तथा परभणी जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर श्रीमती सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांच रविवारी रात्री वसमत रस्त्यावरील मंत्री कॉम्प्लेक्स मधील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील पद्मराज एनर्जी इंडिया लिमिटेड प्रकल्पाचे संचालक संजय मंत्री यांच्या त्या मातोश्री होत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

Read More

पालम (प्रतिनिधी) हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये दि 15 रोजी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा मोठया थाटात पार पडला यात जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर साकोरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताचा पालम भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, लक्ष्मणराव रोकडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लिंबाजीराव टोले, प्रल्हादराव कराळे, भास्करराव कराळे, सुरेश पळसकर, रंगनाथ कल्याणकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष,केशवराव शिरसकर, तालुका उपाध्यक्ष,सुरेश आप्पा,अमोल सुपेकर,योगीराज शिंदे,वाघमारे, बसवेश्वर लिंगायत, सोशल मीडिया शहराध्यक्ष रामजी गावंडे,अविनाश जोशी, मधुकर रोकडे उपस्थित होते

Read More

तडजोड पात्र १८७ प्रकरणे काढली निकाली पालम (प्रतिनिधी ) राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दि.१४ डिसेंबर रोजी पालम येथे विविध तडजोड पात्र प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधून ५८ लाख ५३ हजार २०० रुपये इतकी वसुली झाली झाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या मार्गदर्शना नुसान आणि तालुका विधीसेवा प्राधिकरण पालम,दिवाणी न्यायालया क.स्तर व वकिल संघ पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या अदालतीमध्ये दिवाणी विभागाची पाच, फौजदारी विभागातील २९ आणि बँकेचे वादपूर्व १५३ असे एकूण १८७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोक अदालत यशस्वी करण्याकरीता पालम न्यायालयाचे पॅनल प्रमुख प्रभारी दिवाणी न्यायाधिश एन.एम.रेड्डी,अँड टि.एम.पौळ,वकिल संघाचे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये दत्त जयंती साजरी यावेळी विविध कार्यक्रम पालखी विविध अध्यात्मिक कार्यक्रम सजीव देखावे सादर करण्यात आले.

Read More

पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील रामपूर तांडा येथील महिला सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतचा शासकीय निधीचा अपहार करून वसूलपात्र रक्कम नोटीस देऊनसुद्धा भरणा केली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी महिला सरपंचावर पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाआहे. यामध्ये चार लाख १३ हजार १६३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे नमूद केले आहे. पालम पंचायत समितीचे – गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे यांनी पालम ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२१ ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान तालुक्यातील मौजे रामापूर तांडा ग्रामपंचायतच्या निधीबाबत घडला आहे. सरपंच म्हणून सुबाबाई थावरू राठोड यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायतचा शासकीय निधीचा अपहार करूनसदरील…

Read More

पालम (प्रतिनिधी) येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घडलेल्या हत्याकांडासह परभणी येथील घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दि.१३ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेल्या हत्येचा तपास सीआयडीमार्फत करत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी करून या पाठीमागे कुठली राजकीय शक्ती आहे का ? याचा सखोल तपास करावा या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर वसंतराव सिरस्कर,गटनेते भास्करराव सिरस्कर, प्रकाशराव कोकाटे, भैय्यासाहेब…

Read More

सेलू  (प्रतिनिधी) येथील विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार ( दि. १६ ) डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर ( मुंबई ) यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगांना मिश्कीलपणे टिपून हास्यकल्लोळाची आनंदाभुती देणाऱ्या. जीवनातील ताणतणाव क्षणभरासाठी दूर करणाऱ्या हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले आहे.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, संविधान मानणार्‍यांनाच भारतात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्याने देश सोडावा. परभणीत घडलेल्या संपुर्ण घटनेची गुप्तचर विभागामार्फत कसून चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली. शनिवारी (दि.14) दुपारी परभणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले दाखल झाल्याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करीत आढावा घेतला. त्या नंतर पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाबूराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, दिलीप…

Read More

शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने मिळणार लाभ परभणी, (परभणी) :- राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दि. 16 डिसेंबर 2024 पासून परभणी जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याकरीता मोहीम राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. अॅग्रिस्टॅक योजनेची उद्दिष्टे — राज्यातील सर्व…

Read More