पालम (प्रतिनिधी) हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये दि 15 रोजी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा मोठया थाटात पार पडला यात जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर साकोरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताचा
पालम भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, लक्ष्मणराव रोकडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लिंबाजीराव टोले, प्रल्हादराव कराळे, भास्करराव कराळे, सुरेश पळसकर, रंगनाथ कल्याणकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष,केशवराव शिरसकर, तालुका उपाध्यक्ष,सुरेश आप्पा,अमोल सुपेकर,योगीराज शिंदे,वाघमारे, बसवेश्वर लिंगायत, सोशल मीडिया शहराध्यक्ष रामजी गावंडे,अविनाश जोशी, मधुकर रोकडे उपस्थित होते



