पालम (प्रतिनिधी) येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घडलेल्या हत्याकांडासह परभणी येथील घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दि.१३ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेल्या हत्येचा तपास सीआयडीमार्फत करत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी करून या पाठीमागे कुठली राजकीय शक्ती आहे का ? याचा सखोल तपास करावा
या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर वसंतराव सिरस्कर,गटनेते भास्करराव सिरस्कर, प्रकाशराव कोकाटे, भैय्यासाहेब सिरस्कर,नरसिंग रोकडे,रामजी शिंदे, श्रीनिवास रोकडे, हनुमान देशमुख, अनिल देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


