तडजोड पात्र १८७ प्रकरणे काढली निकाली
पालम (प्रतिनिधी ) राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दि.१४ डिसेंबर रोजी पालम येथे विविध तडजोड पात्र प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधून ५८ लाख ५३ हजार २०० रुपये इतकी वसुली झाली झाली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या मार्गदर्शना नुसान आणि तालुका विधीसेवा प्राधिकरण पालम,दिवाणी न्यायालया क.स्तर व वकिल संघ पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या अदालतीमध्ये दिवाणी विभागाची पाच, फौजदारी विभागातील २९ आणि बँकेचे वादपूर्व १५३ असे एकूण १८७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

लोक अदालत यशस्वी करण्याकरीता पालम न्यायालयाचे पॅनल प्रमुख प्रभारी दिवाणी न्यायाधिश एन.एम.रेड्डी,अँड टि.एम.पौळ,वकिल संघाचे अध्यक्ष एफ. डब्ल्यु. शेख, न्यायालयीन कर्मचारी आर.एन. साबणे, ए.यु. पठाण, एस.आर.भालेराव बी.डी.मुळे,कुमार बनसोडे,मोहन
घुमरे,नवनाथ वाघमोडे, तात्या लटपटे,अभिषेक चौधरी,पो नि. सुरेश थोरात,कोर्ट पैरवी कटारे,सरकारी अभियोक्ता एस.आर. कुलकर्णी, आदीनी परिश्रम घेतले


