परभणी (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोप करीत या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल असे वक्तव्य लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर आले असता आज दुपारी त्यांनी स्व. सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर नवा मोंढा येथील निवासस्थानी परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण सुर्यवंशी कुटूंबियांचे सांत्वन केले, त्यांचे म्हणणे ऐकले. एकूण स्थितीची माहिती घेतली आहे. सुर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलिस जबाबदार असल्याचे स्पष्ट असून पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच सुर्यवंशी याचा मृत्यू झाला असे ते म्हणाले.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे, असे नमूद करीत गांधी यांनी मूळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटूंबियांना न्याय मिळेल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खा. वर्षा गायकवाड, श्रीमती यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर,माजी आ. सुरेश दादा देशमुख, आ. डॉक्टर राहुल पाटील आ. अमित देशमुख माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


