Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवा मोंढ्यातील मीनाताई ठाकरे मार्गावर रस्त्याच्या कामांना 30 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मुहूर्त लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख यांच्या पुढाकाराने अखेर या रस्त्याला पुनर्जन्म मिळालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी या दयनिय अवस्थेतील रस्त्याची प्राधान्याने दखल घेतली व या भागातील सर्व व्यापार्‍यांसह नागरीकांना रस्त्याचे काम करुन देवू, असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे पुढाकार घेवून, पाठपुरावा करीत देशमुख यांनी या रस्त्याच्या कामांना सुरुवात करुन दिली. मंगळवारी (दि.24) या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी या भागातील व्यापार्‍यांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 30 वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर…

Read More

परभणी(प्रतिनिधी)  शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे संस्थेचे संस्थापक कै.म.शं. शिवणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विभागीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सरस्वती विद्यालय गंगाखेडचा चि. कविश रामेश्वर बेद्रे , द्वितीय क्रमांक भारतीय बाल विद्यामंदिरची कु. महेक फातिमा रफिक शेख हिने पटकावले स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेकजी नावंदर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर हे होते. प्रसंगी संस्थेचे सहसचिव ॲड. संजय देशपांडे , सदस्य श्री पवनकुमार झांजरी , श्री एम. जी. विहीटकर, स्पर्धेचे परीक्षक डॉ. दिगंबर रोडे , प्रा. पल्लवी देशपांडे , स्वराज पवार , मुख्याध्यापक अरुण बोराडे , उपमुख्याध्यापक आर .जी .तुम्मेवार प्राथमिकच्या…

Read More

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम स्थानिक तक्रार समिती परभणी, ( प्रतिनिधी) : महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयान्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत स्थानिक तक्रार समिती गठण करण्याबाबतची तरतूद आहे. या समितीचे पुनर्गठण करण्यासाठी नामनिर्देशनाने अध्यक्ष व दोन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नामांकने मागविण्यात येत आहे. अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिलांमधून नामनिर्देशनाने अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी तरतूद आहे. सदस्य (दोन) या पदासाठी महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना/ संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘ढाई अक्षर’ या पत्रलेखन स्पर्धेची आता मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवलेली असून या पत्र लेखन स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी आणि जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे. या पत्रलेखनाचा विषय ‘लिखाणाचा आनंदः डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ असा असून, पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येणार आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात असून, 0 ते 18 आणि 18 वर्षापासून पुढे अशा दोन गटात होणार आहे. त्याकरिता स्पर्धकांनी 1 जानेवारी 2024 ‘माझे वय 18 पेक्षा कमी/जास्त आहे, असा स्पष्ट उल्लेख करावा, तसेच आपले नाव, पत्ता व वयाचा उल्लेख…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा परभणी,(प्रतिनिधी) ग्राहकांनी अतिशय जागरुकपणे खरेदी करावी. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. पासवर्ड कुणालाही शेअर करु नये. आपले आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हातळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे हे उपस्थित होते. तसेच प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य गोविंद देशमुख, सायबर सेलचे अधिकारी श्री. माकोडे, एसबीआय आर्थिक साक्षरता सल्लागार श्री. हट्टेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर आदी…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून त्यांची व्यथा ऐकून घेतली. परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केल्या जाईल. घटनेची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असे श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. श्रीमती…

Read More

सेलू ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य लॅक्रास असोसिएशन व परभणी जिल्हा असोशियन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने १ ली राज्य लॅक्रॉस सब ज्युनिअर व ज्युनिअर क्रीडा स्पर्धा 2024-25. स्पर्धेत वरीष्ठ पुरुष गटात नाशिक, महिला गटात अमरावती तर सबज्युनियर मुले गटात परभणी तर मुलीत सोलापूर अजिंक्य ठरले.स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 22 जिल्हा सहभागी झाले आहेत. पुरुष गटात अंतिम सामना परभणी वि. नाशिक दरम्यान नाशिक संघाने 2 गोल ने विजयी ठरला. व्दितीय परभणी, तृतीय अमरावती. महिला गटात अंतिम लढत ‌ अमरावती विरुद्ध कोल्हापूर यांच्यात 1 गोलने अमरावती विजयी झाली तर व्दितीय कोल्हापूर, तृतीय परभणी ठरली. सबज्युनियर मुले गटात अंतिम लढत  परभणी वि. धुळे…

Read More

जिंतूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वरुड नरसिंह गावचे रहिवासी श्रीकांत प्रल्हाद देव शास्त्री (वय 67 वर्षे) व त्यांच्या पत्नी श्रद्धा श्रीकांत शास्त्री (वय 60 वर्षे) यांनी आपल्या जिद्द, इच्छाशक्ती व भक्तीभावाने नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. टू-व्हीलरवर 4200 किमी प्रवास करत त्यांनी हा अद्भुत अनुभव घेतला आणि सर्वांनाच प्रेरणा दिली. या प्रवासात त्यांच्यासोबत विनय कुलकर्णी मंठेकर आणि सुधाकर कुलकर्णी मंठेकर हे सहप्रवासी होते, ज्यांनी या प्रवासात मोठी मदत केली. अतुलनीय प्रवास नर्मदा प्रदक्षिणा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची यात्रा मानली जाते. श्रीकांत व श्रद्धा शास्त्री यांनी टू-व्हीलरवर प्रवास करत साधारणपणे 4200 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास पूर्ण केला. या यात्रेदरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने 24 ते 29 डिसेंबर दरम्यान येथील सँनरो नॉलेज सिटी (विद्याविहार शैक्षणिक संकुल) येथे सुरभि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरभी महोत्सवात 24 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता स्पोर्ट्स डे निमित्त घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे पथ संचलन, लेझीम, अरेबिक्स मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण होणार आहे. 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता एकात्मिक आदिवासी प्रकल्प तसेच सायंकाळी 6 वाजता क्युरिअस कीड्स, फिनकीडस, ज्ञिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ बालवाडीचा सांस्कृतिक कार्यक्रम, 26 डिसेंबर महाराष्ट्राची लोकधारा व सायंकाळी 5 वाजता पॉस्परस पब्लिक स्कूलचा ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ या सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स इंग्लिश स्कुल…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.23) परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते स्व. विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. खा राहूल गांधी यांनी सोमवारी दुपारी 2.20 वाजता नांदेडहून परभणीत दाखल झाल्याबरोबर नवा मोंढ्यांतील स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्या पाठोपाठ आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते स्व. वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी रवाना होवून वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. पाठोपाठ निवासस्थानी कुटूंबियातील सदस्यांबरोबर हितगुज सुरु केले. खा राहुल गांधी यांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर त्यांचे आंबेडकरी चळवळीतील एकूण…

Read More