परभणी(प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे संस्थेचे संस्थापक कै.म.शं. शिवणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विभागीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सरस्वती विद्यालय गंगाखेडचा चि. कविश रामेश्वर बेद्रे , द्वितीय क्रमांक भारतीय बाल विद्यामंदिरची कु. महेक फातिमा रफिक शेख हिने पटकावले
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेकजी नावंदर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर हे होते. प्रसंगी संस्थेचे सहसचिव ॲड. संजय देशपांडे , सदस्य श्री पवनकुमार झांजरी , श्री एम. जी. विहीटकर, स्पर्धेचे परीक्षक डॉ. दिगंबर रोडे , प्रा. पल्लवी देशपांडे , स्वराज पवार , मुख्याध्यापक अरुण बोराडे , उपमुख्याध्यापक आर .जी .तुम्मेवार प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा , बाल विद्याविहार चे मुख्याध्यापक विनायक लोखंडे , बाल विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश कापसे , पर्यवेक्षक प्रदीप रूघे , बळीराम कोपरटकर , सीमा बोके आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. विवेक नावंदर म्हणाले की , शिवणकर गुरुजी यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्था सुरू करण्याचे धाडस केले. त्यांना इतर मंडळींनी त्यागाच्या भावनेने सहकार्य केले. त्यामुळे आजही संस्था आपले नावलौकिक टिकवून आहे.त्यागाने समर्पणातून उभी राहिलेली ही संस्था सदैव विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करते त्यामुळे अशा स्पर्धातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवून देशाला पुढे नेणारा युवक उभा केला पाहिजे
अध्यक्ष समारोप प्रसंगी बोलताना डॉ. नंदकुमार झरकर म्हणाले की , कणखर मन , ज्ञान, सातत्य, त्याग, शिस्त, नियमांचे पालन हे स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांनी हे सर्व गुण अंगी बाळगले पाहिजे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सरस्वती विद्यालय गंगाखेडचा चि. कविश रामेश्वर बेद्रे , द्वितीय क्रमांक भारतीय बाल विद्यामंदिरची कु. महेक फातिमा रफिक शेख , तृतीय पारितोषिक नरहर कुरुंदकर माध्यमिक विद्यालय कुरुंदयाची कु. प्रतिक्षा प्रभाकर इंगोले तर उत्तेजनार्थ पारितोषिक
एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलूची कु. तनिष्का अनंत तेलभरे , छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय दांडेगाव कु. सुदेशना बाजीराव साळुंके व बाल विद्यामंदिर हायस्कूल चा काझी सुजाउद्दीन नजमोद्दीन यांनी पारितोषिके प्राप्त केली. यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे नियोजन व वेळ अधिकारी म्हणून वक्तृत्व विभाग प्रमुख एम.जी. शेवाळे , नरेंद्र वानरे व राम पतंगे यांनी काम पाहिले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी कै. म. शं.शिवणकर यांच्या जीवनकार्याचा आढावा मांडला. सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी तर आभार स्पर्धा विभाग प्रमुख गजानन जुमडे यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कै.म शं.शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी विजेत्या स्पर्धकांसोबत संस्थाध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर , संस्था सचिव डॉ. विवेक नावंदर , संस्था सदस्य एम. जी. विहिटकर,परीक्षक प्रा. डॉ. दिगंबर रोडे , प्रा. पल्लवी देशपांडे , श्री स्वराज पवार तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक प्रदीप रुघे, बळीराम कोपरटकर, सीमा बोके आदी उपस्थित होते.


