सेलू ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य लॅक्रास असोसिएशन व परभणी जिल्हा असोशियन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने १ ली राज्य लॅक्रॉस सब ज्युनिअर व ज्युनिअर क्रीडा स्पर्धा 2024-25. स्पर्धेत वरीष्ठ पुरुष गटात नाशिक, महिला गटात अमरावती तर सबज्युनियर मुले गटात परभणी तर मुलीत सोलापूर अजिंक्य ठरले.स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 22 जिल्हा सहभागी झाले आहेत.
पुरुष गटात अंतिम सामना
परभणी वि. नाशिक दरम्यान नाशिक संघाने 2 गोल ने विजयी ठरला. व्दितीय परभणी, तृतीय अमरावती. महिला गटात अंतिम लढत अमरावती विरुद्ध कोल्हापूर यांच्यात 1 गोलने अमरावती विजयी झाली तर व्दितीय कोल्हापूर, तृतीय परभणी ठरली.

सबज्युनियर मुले गटात अंतिम लढत परभणी वि. धुळे दरम्यान अतितटी परभणी ग्रामीण 1 गोल ने विजयी ठरला तर व्दितीय धुळे, तृतीय: परभणी शहर विजेता ठरला.
सबज्युनियर मुली गटात सोलापूर वि.नाशिक दरम्यान सोलापूर 2 गोल ने विजयी तर व्दितीय नाशिक, तर नागपूर तृतीय क्रमांक पटकावला.
दि 22 डिसेंबर 2024 .स्पर्धा बक्षीस समारंभ हनुमान गड नूतन विद्यालय क्रीडांगण सेलू येथे पण प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. मोहम्मद बाबर (राज्य सचिव महाराष्ट्र लेक्रास) संतोष कठाळे (जिल्हा अध्यक्ष लॅक्रॉस असोसिएशन) जिल्हा सचिव प्रशांत नाईक, प्रा.नागेश कान्हेकर ,गणेश माळवे आदी मान्यवर उपस्थित होते विजेता संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कारात हेडफोन व स्मार्ट वॉच राज्य लॅक्रॉस संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल गांगडे, शिवकुमार कोळे, श्रीराम निळे, विशाल पवार, सुमित जंजाळ, रामदास गिरी, सिकंदर शेख, अनुराग अंबटी, कुणाला चव्हाण, सुरज शिंदे, महेश काळदाते, अमोल बिचाले, समाधान मस्के, गणेश सावटे, यांनी परिश्रम घेतले.


