परभणी (प्रतिनिधी)गंगाखेड नाका उड्डाणपूल परिसरातील दोन दुकानांना भयंकर आग लागली . सायंकाळी साडेआठच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागली यात चाऊस इलेक्ट्रिशियन आणि रॉयल मोटर्स या दुकानांचा या आगीत बरेचसे सामान जळाले आहे. सुरुवातीला त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झोपडीला आग लागली त्यानंतर या दोन्ही दुकानांना ही आग लागली. काही वेळातच अग्निशामन दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे गंगाखेड नाका अतिशय रहदारीचा रस्ता आहे या लागलेला आगे मुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (छाया उत्तम बोरसुरीकर)


