परभणी,(प्रतिनिधी): माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातही या दुखवट्यात कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी दिले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवार (दि.26) रोजी रात्री निधन झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्यामुळे 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत शासकीय कार्यालय व ज्या ठिकाणी नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्याठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावण्यात यावा. गुरुवार दि. 2 जानेवारी 2025 पासून राष्ट्रध्वज पूर्ण फडकविण्यात यावा, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.



