पालम (प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे पेठशिवणी
शिवारातील गट क्रमांक 40/12 शेतामध्ये 40 ते 50 गांजाची झाडे आसल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांना मिळताच त्यांनी वरीष्ठाची परवानगी घेऊन पेठशिवणी शिवारातील आपला ताफा घेऊन गांजाची झाडे जप्त केली. यावेळी शेत मालक माधव हागरगे यांनी पोलीस आल्याचे पाहुण पळ काडला मात्र पोलीसानी पाटलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतले.

या शिवारात अंदाजे 12 किलो गांजा मिळाला असून यांची किंमत अंदाजे दोन लाख सहाशे पधरा रूपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरु होती. या वेळी पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,उपनि के.एस. देवघरे, पो.उप.नि. प्रकाश लोखडे, पो.ह. कल्यान साठे, जमादार बळवते, बालाजी मोरे,पो.सि. सिघनवाड,पो ना. सारंग शहाणे व ना.तहसिलदार राजेश्वर पवळे घटणास्थळी उपस्थित होते. आरोपिस सह गांजाची झाडे पो. स्टेंशन येथे आण्यात आले आहे


