परभणी,(प्रतिनिधी) पाथरी रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल येथे एक जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यातील पहिल्या 100 रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत आहेत, यामध्ये हृदयरोग आजाराचे प्रमाण वाढत आहे.तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, या आजाराचे धोके ओळखून लवकर निदान व उपचार केल्यास संबंधित आजाराचे प्रमाण व मृत्यू रोखता येतो ही गरज ओळखून आ. डॉ.राहुल पाटील यांनी आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या दरम्यान सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) मौजे डिग्रस ता परभणी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या गायरान जमीनीतून जालना नांदेड समृधी महामार्गासाठी मुरूम नेण्यासाठी ग्रामपंचायत अग्रेसर असुन मानवी हक्क अभियान च्या माध्यमातून एक इंचही मुरूम नेऊ देणार नाही असा ईशारा मानवी हक्क अभियान च्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे. मानवी हक्क अभियान हि एक सामाजिक संघटना असुन गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात अतिक्रमित गायरान जमीनीवर अतिक्रमण शासनाच्या निर्णयानुसार नियमाकुल करण्यासाठी, दलित, आदिवाशी, भुमहिन शेतमजूर यांच्यावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध लोकशाही मार्गाने संघर्षशील कृतीतून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. मानवी हक्क अभियान च्या वतीने 2027 ते 2010 या तीन वर्षात मा तहसीलदार साहेब,…
परभणी,(प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील सुरत येथे 28 ते 31 डिसेंबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी भारतामध्ये मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत 14 व 17 वर्षे या दोन्ही गटामध्ये सुवर्णपदक व रौप्य पदक अखंड भारतातून परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवले. त्यामधे प्रज्वल बाळासाहेब आंबोरे व आदित्य नितीन खळीकर अनुक्रमे 14 व 17 वयोगट सुवर्णपदक, पार्थ शिंदे व अभिषेक परमेश्वर शिंदे 14 व 17 वयोगट अनुक्रमे रौप्य पदक पटकावले. तसेच सीनियर गट रमण संगीतम व साईदीप मठपलू कास्यपदक,च हर्षद जाठोडे टीम चॅम्पियनशिप सुवर्णपदक, दिव्या आवाड, वैष्णवी राऊत आक्रोबाटिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय सहभाग म्हणजेच परभणीच्या सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताला थक्क करणारा…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरातील मंगळवारा पेठ व क्रांती चौक या भागातील तसेच लोकमान्य नगरातील रस्ते व अन्य विकास कामांचा शुभारंभ मंगळवार 31 डिसेंबर रोजी झाला. महापालिका प्रभाग क्रमांक 8 मधील मंगळवारा पेठ व क्रांती चौक भागातील रस्ते कामांचा शुभारंभ प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अशोकराव जाधव, मनोज तळेकर, अनिल झांबरे, अजय देशमुख, शाम ठाकूर, पंकज देशमुख, मोईन खान, काम्रान खान, हबीब भाई, आजमत खान, विजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य नगरातील कामांना सुरुवात… महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मधील लोकमान्य नगर येथील रस्त्यासह गार्डनच्या विकासकामांचे भूमिपूजन महायुतीच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक…
पालम (प्रतिनिधी ) शहरात श्री संत मोतीराम महाराज यांच्या जन्म भूमी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा देवघर येथे भविष्य महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन दि.२ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत आयोजित केले. या ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्थापना केलेली असून दर शुक्रवारी कुंकूमार्चना विधी केला जातो. शनिदेवाची मुर्ती स्थापना केली आहे. नवगृह मुर्ती स्थाना केले आहे. नवगृहाचे जप व होम हवन केले जाते तसेच सदगुरू साईकृष्ण गोशाळा ही जांबुळबेट रोड येथे स्थापना करण्यात आलेली आसुन या सर्वांचे औचित्य साधून गुरुवार 02 जानेवारी ते 09 जानेवारी गुरूवार पर्यंत पालम येथे भविष्य महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.…
पालम(प्रतिनिधी) ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे परभणी जिल्हा संघटन मंत्री भगवान करंजे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. पालम तालुक्यातील पेठशिवणी येथिल जि.प.हायस्कूल येथे ग्राहक जागरण पंधरवडा निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूख्याद्यापिका सावित्रा दासडवाड मॅडम, मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा संघटक मंत्री भगवान करंजे तर प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक नामदेव पोले सर यांनी…
परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत प्रशासकीय विभाग/ सार्वजनिक प्राधिकरणांच्या सेवा देण्याच्या कामगिरीच्या मुल्यांकरीता तपासणीबाबतचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणास विभागप्रमुख उपस्थित होते. राज्यातील नागरिकांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारीत करण्यात आला आहे. त्यामधील अंतभूत कलम 20 (3) तसेच कलम 20 (5)(क) मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी व्दितीय अपिलीय प्राधिकारी आपल्या अधिनस्त समस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या या कायद्यातंर्गत दिलेल्या सेवांच्या कामकाजाचे कार्यमुल्यमापन करणे आवश्यक आहे. हे कार्यमुल्यमापन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन या…
परभणी (प्रतिनिधी) : जागतिक धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधून 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इंद्रायणी माळ मांडाखळी परिसरात नियोजित महविहाराच्या 10 एकर जागेवर 50 फूट उंचीच्या धम्म ध्वजाच्या ध्वजारोहन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली. यावेळी उदघाटक म्हणून थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग, प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता डॉ. गगन मलीक, आमदार राजेश विटेकर, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत मुदितानंद थेरो, भदंत मोगलायन, डॉ. सिध्दार्थ भालेराव, कुणाल कांबळे मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील उपासक – उपासिका यांनी उपस्थित रहावे, असे…
परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सकस आहार , व्यायाम व खेळ याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाचा व बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो. शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकासाच्या बळावर विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. यासाठी पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयरुपी आकाशाला गवसणी घालायची असेल तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. असे प्रतिपादन समुपदेशक प्रविण सोनोने यांनी केले. शहरातील बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळेत *सखी सावित्री समितीच्या* वतीने आयोजित कार्यक्रमात प्रशालेतील ज्येष्ठशिक्षक तथा समुपदेशक प्रविण सोनोने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका…
डिजीटलचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती: खेळीमेळीच्या वातावरणात झाली निवड प्रक्रिया संपन्न परभणी(प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली. शहरातल्या सावली शासकीय विश्रामगृहावर संपन्न झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या बैठकीसाठी डिजीटल मिडीया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती. परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या अध्यक्ष्ज्ञतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभू दिपके, कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारे यांची निवड करण्यात आलीय. तर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनुने, डिजीटल मिडीया जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख इफ्तेखार तर महानगर अध्यक्षपदी राहूल…

