परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरातील मंगळवारा पेठ व क्रांती चौक या भागातील तसेच लोकमान्य नगरातील रस्ते व अन्य विकास कामांचा शुभारंभ मंगळवार 31 डिसेंबर रोजी झाला.

महापालिका प्रभाग क्रमांक 8 मधील मंगळवारा पेठ व क्रांती चौक भागातील रस्ते कामांचा शुभारंभ प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अशोकराव जाधव, मनोज तळेकर, अनिल झांबरे, अजय देशमुख, शाम ठाकूर, पंकज देशमुख, मोईन खान, काम्रान खान, हबीब भाई, आजमत खान, विजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमान्य नगरातील कामांना सुरुवात…
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मधील लोकमान्य नगर येथील रस्त्यासह गार्डनच्या विकासकामांचे भूमिपूजन महायुतीच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक रितेश जैन, बबलू टाक, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रथम महापौर प्रताप देशमुख, भाजप नेते राजेश देशमुख, शिवसेना नेते आनंद भरोसे, शिवसेना महानगरप्रमुख नितेश देशमुख, सुनील देशमुख, राष्ट्रवादी युवक शहरजिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे, प्रेरणाताई वरपुडकर व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


