पालम(प्रतिनिधी) ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे परभणी जिल्हा संघटन मंत्री भगवान करंजे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. पालम तालुक्यातील पेठशिवणी येथिल जि.प.हायस्कूल येथे ग्राहक जागरण पंधरवडा निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूख्याद्यापिका सावित्रा दासडवाड मॅडम, मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा संघटक मंत्री भगवान करंजे तर प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक नामदेव पोले सर यांनी दिनांक 24 डिसेंबर ग्राहक दिन म्हणून आपण देशभर साजरा करतो, या निमित्ताने सुजान ग्राहकांना खरेदी- विक्री अथवा देवाण-घेवाण व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना जागे करण्याचे काम या निमित्ताने केले जाते. असे त्यांनी प्रस्ताविक करताना सांगितले.
यानंतर पुढे मार्गदर्शन करताना भगवान करंजे म्हणाले की, शोषणमुक्त ग्राहक होण्यासाठी ग्राहकांना प्रबोधन जागे करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना झाली असल्याचे सांगून संघटनेने ग्राहक हिताचे कायदे बनवण्यासाठी सरकारला विनंती केली आणि आज सरकारने ग्राहक संरक्षणासाठी 2019 अन्वे कायदा अमलात आणला आहे. त्याचा लाभ ग्राहकांना होत असल्याची त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे सर यांनी ग्राहक हा राजा आहे. तो आवश्यकतेनुसार त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वस्तूची खरेदी किंवा सेवा या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जातो वस्तू खरेदी करताना ग्राहकाने जागरूक राहावे असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अध्यक्षीय समारोपात त्यांनी त्यांना घडलेल्या अनुभवातील घटना त्यांनी सांगितली त्यामध्ये त्यांनी ऑनलाइन लॅपटॉप खरेदी प्रकरण सांगितले लॅपटॉप खरेदीचे पैसे कंपनीला पाठवले परंतु कंपनीने लॅपटॉप काही पाठवलेच नाही त्यावेळी मला लक्षात आले की आपली फसवणूक झाली त्यानंतर मी चिंताग्रस्त होऊन त्या कंपनीचा ऑनलाईन तक्रारीच्या माध्यमातून पाठपुरावा केला परंतु त्या कंपनीने काही लॅपटॉप दिला नाही अखेर मी न्याय मागण्यासाठी परभणी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली त्यानंतर मला ग्राहक मंचातून न्याय मिळाला मी लॅपटॉप साठी भरलेले तीस हजार रुपये कंपनीकडून वसूल झाले हा माझा अनुभव आहे म्हणून ग्राहकांनी शक्यतो ऑनलाईन खरेदी करण्या ऐवजी दुकानात जाऊन प्रत्यक्ष वस्तू पाहूनच खरेदी करावी,असे सांगितले.


