परभणी (प्रतिनिधी) : जागतिक धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधून 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इंद्रायणी माळ मांडाखळी परिसरात नियोजित महविहाराच्या 10 एकर जागेवर 50 फूट उंचीच्या धम्म ध्वजाच्या ध्वजारोहन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली.
यावेळी उदघाटक म्हणून थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग, प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता डॉ. गगन मलीक, आमदार राजेश विटेकर, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत मुदितानंद थेरो, भदंत मोगलायन, डॉ. सिध्दार्थ भालेराव, कुणाल कांबळे मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील उपासक – उपासिका यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक डॉ. हत्तीअंबिरे व समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


