परभणी,(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित मॅथ क्विझ स्पर्धेमध्ये नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ते पुढील विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले.
या स्पर्धेत कु.मोक्षदा लक्ष्मीकांत गरुड, कु.अदिती दयानंद जाधव, चि.सर्वेश संतोष पेडगावकर, चि. सोहम सुनील बल्लाळ हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. आता ते विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत. संघातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक सुनील रामपूरकर, गणेश सूर्यवंशी, सुधाकर रेडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, कार्यकारणी सदस्य व्यंकटेश तोरंबेकर, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक सुर्यकांत पाटील, शिवाजी आरळकर, सुनील रामपुरकर, श्रीपाद कुलकर्णी, विश्वास दिवाळकर, विनोद लोलगे डॉ. सुनील तुरुकमाने, अभिजित कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.



