परभणी, (प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथून दु. १.०० वा. राहूलनगर, परभणी येथे आगमन व दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. दु. १.४५ वा. पार्वतीनगर, परभणी येथे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. दु. २.३० वा. शासकीय विश्रामगृह, परभणी येथे समाजकल्याण अधिकाऱ्यांसमवेत बैठक. दु. ४.०० वा. शासकीय विश्रामगृह, परभणी येथे पत्रकार परिषद. दु. ४.३० वा. छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.


