गंगाखेड (प्रतिनिधी) शहरातील मागील 40 वर्षापासून घरगुती मेस चालवणाऱ्या व प्रत्येकाच्या तोंडी ताई, मावशी, आत्या असलेल्या राधाबाई हनुमानदास भंडारी ज्या गंगाखेड शहर व परिसरात साक्षात अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जात त्यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दिनांक 28 डिसेंबर रोजी निधन झाले. शहरांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने येणारे विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने येणारे कर्मचारी, बँकेतील कर्मचारी या एक ना अशा कितीतरी जणांना आपल्या हातचे चविष्ट, रुचकर जेवण आत्मीयतेने जेवु घालणाऱ्या राधा मावशी यांच्या जाण्याने शहर व परिसरात शोककळा पसरली. दर एकादशीला फळा
येथील संत मोतीराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणे व प्रत्येक दिवाळीमध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या शेगाव या ठिकाणी त्या जात असत .अत्यंत शांत, संयमी, आध्यात्मिक, मायाळू अशी ओळख असलेल्या या राधा मावशींना गंगाखेड शहर व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने गोदा काठावरील स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप देण्यात आला. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


