परभणी, (प्रतिनिधी) नगर विकास विभाग यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२५ चे आज दि. 2 जानेवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे उद्घाटन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी, उद्घाटक म्हणून धैर्यशील जाधव, आयुक्त परभणी मनपा,आयोजक प्रदीप जगताप, जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय हे उपस्थित होते.
कार्यक्रमास जयवंत सोनावणे मुख्याधिकारी, नगर परिषद गंगाखेड, डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा, बबन तडवी, उपआयुक्त मनपा परभणी,तुकाराम कदम मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी,आशुतोष चिंचाळकर मुख्याधिकारी नगर पंचायत पालम,कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत, युवराज पौळ मुख्याधिकारी नगर परिषद सेलू, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव ,चंद्रकांत पवार, उमेश आर्दड यांच्यासह परभणी शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत विभागाचे कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)



