परभणी (प्रतिनिधी) न्यायालीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना बुधवारी(दि.8) प्रशासनातील अधिकारींनी भेट दिली यावेळी सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांसाठी जाहीर झालेल्या दहा लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यासाठी हे अधिकारी तिथे गेले होते परंतु कुटुंबीयांनी हाच एक घेण्यास नकार दिला असून सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही आर्थिक मदत घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे सोमनाथ याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्याला जिम्मेदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी या आणि अन्य मागण्या कुटुंबीयांनी सरकारकडे ठेवले आहेत कारवाई झाल्याशिवाय आम्ही कोणतीही आर्थिक मदत घेणार नाही असं सोमनाथ याच्या कुटुंबीयांनी जाहीर केला आहे ( छाया संजय घनसावंत)
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात येत आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदल होत असताना त्या विषयीची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्या साठी सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ज्ञानोपासक महाविद्यालयातील बारावी कला,वाणिज्य व विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यां समोर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. साधन व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे आणि प्रोफेसर डॉक्टर आनंद मनवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या…
परभणी,(प्रतिनिधी) : प.पु. राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या जन्मभूमी श्रीक्षेत्र पाचलेगाव ते समाधीस्थान श्रीक्षेत्र नैकोटवाडी या दरम्यानच्या पदयात्रेस रविवार 5 जानेवारी रोजी पाचलेगाव येथून प्रारंभ झाला. मंगळवार 7 जानेवारी रोजी या पदयात्रेसह पालखीचे परभणी महानगरात आगमन झाले. मध्यवस्तीतील देशमुख गल्लीतील मोठा मारोती संस्थानच्या वतीने या पालखीचे मंगळवारी सायंकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब देशमुख, अॅड. दीपक देशमुख, अरविंद देशमुख, श्रीधर देशमुख, अशोक परळीकर, आर.एस. देशमुख, पंकज देशमुख, सतीश देशमुख, दिलीप नगरसाळे, दिलीप देशमुख, गजानन लव्हाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, बुधवार 8 जानेवारी रोजी तरोडा फाटा, तर मुक्कामी पोखर्णी संस्थानात, 9 जानेवारी रोजी दैठण्यात तर मुक्कामी माँ कनकेश्वरी अन्नछत्रालयात, 10 जानेवारी…
परभणी ( प्रतिनिधी) दि.23 डिसें. 2024 रोजी परभणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,प्रभावती विद्यालय,विद्यानगर परभणी.येथे संपन्न झाले या प्रदर्शनात बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर विभागातील चि.निखिल मंगेश लताड वर्ग आठवा [जी]या विद्यार्थ्याने फायर आणि गॅस लिक अलार्म हा प्रयोग सादर केला होता.वर्ग सहावी ते आठवीच्या गटातून या प्रयोगाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून या प्रयोगाची परभणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रयोगासाठी निखिल ला प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री.बाळाभाऊ दंडवते सर,श्री.राम पतंगे सर,श्री. सचिन वानरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 या कालावधीत राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय,गंगाखेड रोड,परभणी.येथे आयोजित परभणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हा प्रयोग सादर होणार…
परभणी (प्रतिनिधी) मंगळवार दि.7 जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची डॉ.सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विवीध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात खरीप हंगाम 2024 मधिल अतिवृष्टीचे प्रलंबीत अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, 2024 च्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या अधिसूचित शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम पिक विमा भरपाई देण्यात यावी, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातूनविनाविलंब जिल्हयातील संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यात यावी, सिल्क उत्पादक शेतकऱ्यांचे शेडसह ईतर प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावे, तसेच कापूस खरेदी केंद्र व ईतर शेती विषयांच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधी व सर्व विभाग…
मुंबई, – एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत…
ज्येष्ठ पत्रकार हेमंत कौसडीकर, विजय जोशी, संतोष धारासुरकर, दिलीप माने, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी ,राजा पुजारी, जकीयोद्दीन कतीब आदी सन्मानित परभणी(प्रतिनिधी) भारतातील लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ अत्यंत महत्वाचा असून अन्य तीन स्तंभावर भाष्य करण्याची आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्याची भूमिका हा स्तंभ पार पाडतो. त्यामुळे हा स्तंभ मजबूत कसा होईल? याची जबाबदारी सर्वांची आहे. भारतातील लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट शासन व्यवस्था असून जगभरातून आपल्या लोकशाहीचा मोठा आदर केला जातो. लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचं योगदान मोठं असल्याचे प्रतिपादन वनामकृविचे कुलगूरु डॉ. इंद्र मणि यांनी केले. परभणीच्या शारदा महाविद्यालयातील कै. हेमराजजी जैन सभागृहात जिल्हा पत्रकार संघ आणि…
श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिन उत्साहात साजरा सेलू (प्रतिनिधी) मंगळवार दि 7 रोजी येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, राम सोनवणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, डॉ. विलास मोरे, मोहन बोराडे, दिलीप डासाळकर, शिवाजी आकात, मोहम्मद इलियास, संजय मुंडे, जयचंद खोना, मोहसीन मामू, शिवाजी शिंदे, निरज लोया, निशिकांत रोडगे, सतीश आकात, आबरार बेग, दीपक जडे, संदीप वरकट आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. संजय रोडगे म्हणाले की, 2025 हे वर्ष श्रीराम प्रतिष्ठानचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे. ज्या…
परभणी (प्रतिनिधी) जागतिक धम्म ध्वज दिनानिमित बुधवार दि. ८ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजता थायलंड येथील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत इंद्रायणी माळ, मौजे डफवाडी- मांडाखळी परिसरात पहिल्यांदाच नियोजित महाविहाराच्या १० एकर जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचे ध्वजारोहण प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे ,अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस अनु.जाती विभाग, यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग ,यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता डॉ. गगन मलीक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूर्णा, भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोग्गलायन , आ.राजेश विटेकर पाथरी, डॉ. सिध्दार्थ भालेराव, चेअरमन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय…
परभणी,(प्रतिनिधी) निरनिराळ्या व्याधी पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे हा उत्तम पर्याय आहे असा सूर परभणी मेडिकल कॉलेज येथे तरुणांचे लसीकरण काळाची गरज व बदलते स्वरूप या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेत उमटला. वैद्यकीय क्षेत्रात दररोज नव्या ज्ञानाची भर पडते त्याचा वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांना फायदा होतो त्यासाठी वैद्यकीय निरंतर शिक्षणासारख्या परिषदांना बाहेर ठिकाणी जाऊन तेथे हजेरी लावणे बंधनकारक आहे,परंतु सर्वच परिषदांना हजेरी लावणे डॉक्टरांना शक्य होत नाही यामुळे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाने नुकतीच प्रौढांचे लसीकरण काळाची गरज व बदलते स्वरूप या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी यांची…

