परभणी ( प्रतिनिधी) दि.23 डिसें. 2024 रोजी परभणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,प्रभावती विद्यालय,विद्यानगर परभणी.येथे संपन्न झाले या प्रदर्शनात बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर विभागातील चि.निखिल मंगेश लताड वर्ग आठवा [जी]या विद्यार्थ्याने फायर आणि गॅस लिक अलार्म हा प्रयोग सादर केला होता.वर्ग सहावी ते आठवीच्या गटातून या प्रयोगाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून या प्रयोगाची परभणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या प्रयोगासाठी निखिल ला प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री.बाळाभाऊ दंडवते सर,श्री.राम पतंगे सर,श्री. सचिन वानरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 या कालावधीत राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय,गंगाखेड रोड,परभणी.येथे आयोजित परभणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हा प्रयोग सादर होणार आहे.त्याबद्दल बाल विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी चि.निखिल लताड चे पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले व त्याला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.


