परभणी (प्रतिनिधी) न्यायालीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना बुधवारी(दि.8) प्रशासनातील अधिकारींनी भेट दिली यावेळी सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांसाठी जाहीर झालेल्या दहा लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यासाठी हे अधिकारी तिथे गेले होते परंतु कुटुंबीयांनी हाच एक घेण्यास नकार दिला असून सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही आर्थिक मदत घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे
सोमनाथ याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्याला जिम्मेदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी या आणि अन्य मागण्या कुटुंबीयांनी सरकारकडे ठेवले आहेत कारवाई झाल्याशिवाय आम्ही कोणतीही आर्थिक मदत घेणार नाही असं सोमनाथ याच्या कुटुंबीयांनी जाहीर केला आहे ( छाया संजय घनसावंत)


