परभणी,(प्रतिनिधी) : जय बजरंगी हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नववर्षानिमित्त महेश मंदिरात रविवारी (दि.5) संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार करण्यात येणार आहे. अकराशेहुन अधिक दिवे प्रज्वलित करून सर्वत्र शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा तसेच 2025 हे वर्ष सुख, समाधान आणि शांतीचे तसेच भरभराटीचे जावो यासाठी दरवर्षी जय बजरंगी हनुमान चालीसा मंडळ सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करते. यावर्षीचे हे पाचवे वर्ष आहे. विष्णू नगरातील महेश मंदिरात सकाळी 8.00 वाजता श्री राम, लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमा पूजनाने या संगीतमय हनुमान चालीसा पठणाला प्रारंभ होणार आहे. दिवसभर शेकडो हनुमान भक्त भाविक सह परिवार यामध्ये सहभागी होणार आहेत. सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अखंडपणे संगीतमय हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे. साडेसहा वाजता मंदिर परिसरात अकराशे दिवे प्रज्वलित करून शांततेसाठी तसेच सुख समाधानासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर महाआरती होणार आहे. मागील पंधरा वर्षापासून बजरंगी हनुमान चालीसा मंडळ शहरात वेगवेगळ्या हनुमान भक्तांच्या घरी हनुमान चालीसा पठण करते. यामध्ये 100 हून अधिक हनुमान भक्त परिवार जोडले गेलेले आहेत.
शहरातील सर्व भाविक भक्तांनी या सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



