महाविहाराच्या जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न.
परभणी (प्रतिनिधी) जागतिक धम्म ध्वज दिनानिमित आज ८ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ११ वाजता इंद्रायणी माळ, मौजे डफवाडी- मांडाखळी परिसरात पहिल्यांदाच नियोजित महाविहाराच्या १० एकर जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचा ध्वजारोहण प्रतिष्ठापना सोहळा धम्ममय वातावरणात पार पडला.
थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग ,यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या सोहळ्याचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग यांनी केले होते.
या सोहळ्यास सिने अभिनेते डॉ. गगन मलीक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूर्णा, भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोगलायन ,भंते धम्मघोष, भदंत चंद्रमणी ,भंते धम्मकिर्ती, भंते प्रज्ञाबोधी, मा.जि.प.अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, डॉ. सिध्दार्थ भालेराव, चेअरमन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे मुंबई ,पिआरपीचे नेते गौतम मुंडे, मा.मनपा सभापती आकाश लहाने अनिल कांबळे , राहुल साळवे, मान्यवर उपस्थित होते.

यावेळी थायलंड येथील भदंत कृदांग यांनी इंग्रजी भाषेत धम्मदेशना दिली त्यांचा अनुवाद करण्यात आला. मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, आजचा दिवस हा मोठा दिवस आहे. बुद्धांच्या भारत भूमीवर ध्वज फडकिवला आहे. भारत व थायलंड एकत्रित बुद्ध धम्माचे कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले . पुढे बोलताना ते म्हणाले कि , बुद्धांनी सत्य शिकवले असून बुद्धांचा धम्म दिला या धम्माचे पालन करावे.धम्म वाचण्याने लिहण्याने नाही तर धम्माच्या मार्गाने जावे लागेल. धम्माचे आचरण केल्यामुळे निर्वाण मार्गावर जाता येते. जो धम्म समजतो आचरण करतो त्यांना बुद्ध समजतात म्हणून धम्माच्या शिकवणुकी नुसार आचरण करावे .

कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे प्रास्तविक पर बोलताना म्हणाले कि आज जागतिक धम्म ध्वज जगात साजरा केला जातो ,नवीन बुद्ध विहारासाठी १० एकर जागा स्वबळावर विकत घेतली आहे. ही जागा सर्वासाठी असून या ठिकाणी देशातील एक नंबरचे गोल्डन बुद्धविहार निर्माण करणार आहे. विपश्यना केंद्र, भिख्खू निवास, भिक्खु प्रशिक्षण केंद्र निर्माण होणार आहे. येणाऱ्या काही महिन्यात या विहाराचा भूमिपूजन सोहळा करण्यात येणार आहे. या जागेला पर्यटन- तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. भारत बुद्धमय होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते, धम्माची चळवळ गतिमान झाली पाहिजे. समाज आज एकत्रित झाला आहे. मी चळवळीचा कार्यकर्ता असून बुद्ध डॉ.बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम होत आहे. सर्वांच्या ताकदीने धम्म पदयात्रा यशस्वी झाली. पुढील वर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भिक्खु संघाच्या उपस्थित आंतर राष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी सिने अभिनेता डॉ.गगन मलिक म्हणाले कि, आज धम्म ध्वजाचा सर्वात मोठा कार्यक्रम परभणीत होत आहे. ही गर्वाची बाब आहे. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यामुळे या जागेवर आकर्षक स्वर्ण बुद्धविहार निर्माण होणार आहे हे कार्य करायचे आहे देशात डॉ. बाबासाहेबांमुळे बुद्ध धम्म पुनर्जीवित झाला. बाबासाहेबांनी देशाचे संविधान लिहले, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आज पर्यंत देशात २५ हजार बुद्ध मुर्त्याचे वाटप केले आहे चांगले विहार निर्माण झाले पाहिजे . यावरून आपण बुद्धीस्ट असल्याची ओळख निर्माण होते. बुद्धविहार व भिक्खु निर्माण झाले पाहिजे शेवटी जयभीमचा जयघोष करण्यात आला.
यावेळी डॉ.सिद्धार्थ भालेराव ,सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे ,यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी धम्मदेशनापर बोलताना पंचशिल ध्वजाबद्दल माहिती दिली. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी जागा घेण्याचा व विहार निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. तो पूर्ण होईल धार्मिक निष्ठेने आज समाज एकत्रित झाला. धम्म कार्यात एकमेकात मतभेद ठेवू नये. येणाऱ्या काळात या जागेवर विहार भिक्खु निवास श्रामनेर प्रशिक्षण केंद्र निर्माण होणार आहे या कार्याच्या भिक्खु संघ पाठीशी आहे.
या कार्यक्रमास, मिलिंददादा सावंत, डॉ.प्रकाश डाके , भगवान जगताप, राणूबाई वायवळ, डॉ.बी. टी. धुतमल,अरविंद भक्ते , डी.आर तूपसुंदर, बी.आर.आव्हाड, शेषराव जल्हारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भिक्खु संघाचे महिला उपासकांनी भिक्खु संघाचे पुष्प वर्षाव करून स्वागत केले. बुद्ध वंदना घेण्यात आली.भिक्खु संघ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्र संचलन प्रा.डॉ.सुनिल तूरुकमाने , आभार प्रदर्शन प्रा.डॉ.भीमराव खाडे सर यांनी केले..कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.राजेश रणखांबे, सुधिर कांबळे,अमोल धाडवे ,मकरंद बानेगावकर, अक्षय जगताप, प्रकाश हतागळे, रामचंद्र गायकवाड, पंढरी गायकवाड,भगवान काळे, मारोती काळे, साहेब गायकवाड, उत्तम गायकवाड, बालासाहेब लाटे ,आकाश माने, प्रदीप जोंधळे, कपिल बनसोडे, भूषण कसबे, मिलिंद घुसळे, अजय रसाळ, राहुल मकासरे, ॲड मोती शिंदे,अजय वाघमारे, बुद्धभूषण हत्तीअंबिरे, अंबादास तूपसमुंद्रे, सत्यशिल धबडगे इत्यादीनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मांडाखळी, उमरी ,डफवडी भोसा, लोहरा, पिंपळगाव ठोंबरे , सोन्ना , परभणी, पूर्णा , मानवत इत्यादी भागातील बौध्द उपासक – उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


