परभणी (प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कै. यशवंत पाध्ये पुरस्कार भुषण मोरे यांना त्यांनी मागील 24 वर्षांमध्ये त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रामधील आदर्श कार्याची नाममुद्रा निर्माण केल्याबद्दल व त्या माध्यमातून सामाजिक सेवा केल्याबद्दल दिनांक 6 जानेवारी दर्पण दिनी माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दर्पण दिन व मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व कैलासवासी यशवंत पाध्ये यांच्या प्रतिमा चे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल तथा केंद्रीय मंत्री राम नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉक्टर सुक्रत खांडेकर हे होते. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यावेळी सभा अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन पण भाषणे होऊन पुरस्कार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली


