गंगाखेड (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड तालुका कार्यकारीणीच्या वतीने 19 जानेवारी 2025 रविवारी रोजी सकाळी 11 वाजता दर्पण दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे, या मेळाव्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर यांच्यासह प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (टायगर) यांच प्रमुख व्याख्यान आयोजित केले आहे, याव्यतिरिक्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा जिल्हास्तरीय कार्यक्रम असणार आहे,तरी आपली उपस्थिती प्राथनिय आहे
Author: Lok Sanchar
पालम (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य आणि राष्ट्रीय निष्ठा यांची वाढ होते . त्यातूनच जबाबदार नागरिक घडत असतात. असे प्रतिपादन राष्ट्रीय रत्न भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी केले . तालुक्यातील जवळा येथे माधवराव पाटील महाविद्यालय पालम च्या रोसयोचे वार्षिक विशेष शिबीर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून भाई तुषार गोळेगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विनोद पवार , सरपंच महानंदा खटींग.प्राचार्य डॉ . एच.टी. सातपुते , उपप्राचार्य डॉ.ए.डी आरसुळे व मुअ आनंद गिजे यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना भाई लक्ष्मणराव गोळेगावकर म्हणाले की, शिबीर ग्रामीण भागात होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे…
परभणी (प्रतिनिधी) 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा संपन्न होत आहे.. या मेळाव्याच्या निमित्तानं पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी दिली.. 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून रॅलीला सुरूवात होईल.. रॅली शिक्रापूर, शिरूर, नगर, जामखेड, कडा, आष्टी, पाटोदा फाटा, बीड, वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रात्री 8 वाजेपर्यंत सेलू येथे पोहोचेल.. पुणे ते सेलू हे अंतर अंदाजे 350 किलो मिटर एवढे आहे.. पुणे येथून रॅली निघाल्यानंतर मार्गावरील तालुका संघांनी गावातील प्रमुख व्यक्ती…
सेलू,(प्रतिनिधी) : सेलू येथील साई नाट्य मंदिरात 1 फेबु्रवारी रोजी होणार्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, मो. इलियास, सचिव शेख मोहसीन, कांचन कोरडे, शेख राज आदींनी मंगळवारी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या संभाजी नगर येथील निवासस्थानी भेट घेऊन या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मंत्री संजय सिरसाट यांनी हे निमंत्रण स्विकारुन या मेळाव्यास आपण उपस्थित राहू, असे म्हटले. दरम्यान, या मेळाव्यास प्रमुख…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील बाल विद्यामंदिर हायस्कूलचा विद्यार्थी अनुज आशिष कवठेकर याची गुजरात येथे होणार्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेतून 14 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राचा संघ निवडी करिता निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर या विभागातून महाराष्ट्र संघाच्या निवडीकरिता खेळाडू आले होते. अनुजने औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत अतिशय उत्कृष्ट खेळी करून महाराष्ट्र संघात आपली निवड सार्थ ठरवली. विजयी खेळाडूंसह क्रीडा…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील बाल विद्यामंदिर हायस्कूलचा विद्यार्थी अनुज आशिष कवठेकर यांची गुजरात येथे होणार्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेतून 14 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राचा संघ निवडी करिता निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर या विभागातून महाराष्ट्र संघाच्या निवडीकरिता खेळाडू आले होते. अनुजने औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत अतिशय उत्कृष्ट खेळी करून महाराष्ट्र संघात आपली निवड सार्थ ठरवली. विजयी खेळाडूंसह क्रीडा…
परभणी (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील पारवा येथे दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याची घटना होऊन पंधरा दिवस उलटूनही तपास संथ गतीने सुरू असल्यामुळे या प्रकरणात जलद गतीने तपास करून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन केली आहे. पारवा येथे दिनांक 3 जानेवारीला एका शेत आखाड्यावर दरोडा टाकून तिघांना मारहाण करण्यात आली तर एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला ही घटना घडल्यानंतर या घटनेचा तपास संथगतीने सुरू आहे अजून एकाही आरोपीला पकडले नाही त्यामुळे जलद गतीने तपास करून तात्काळ आरोपींना पकडावे तसेच गरीब पीडित…
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक संपन्न परभणी, (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या प्रगतीकरीता शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची दखल घेऊन त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकरीता अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा आणि शेती विकासाचे कार्यक्रम राबविणे व त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे अशा उपायायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्यावतीने कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुर्नरचना करण्यात आली आहे. मिशनचे अध्यक्ष पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित…
परभणी, (प्रतिनिधी): सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते आज (दि. 15) रोजी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता चव्हाण, रेशीम विकास अधिकारी जी.आर.कदम, क्षेत्र सहायक के.एम. जाधव, एस.ए. मिसाळ, श्री. वागदकर, श्री. हट्टेकर, ए.एस. जोगदंड, आर.एल. मुंडे, एस.आर.वाघ आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील समीर काळे आणि राजेश दुधवडे आदी मनरेगा कर्मचारी उपस्थित होते. नविन तुती लागवड करण्यासाठी…
परभणी,(प्रतिनिधी): मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये मंगळवार (दि. 14) रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त मराठी भाषेवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कथाकार राजेंद्र गहाळ यांनी मराठी भाषेचे महत्व पठवून दिले व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जिवनात मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ग्रंथ प्रदर्शन दि. 14 ते 28 जानेवारी, 2025 दरम्यान सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गाडेवाड यांनी केले. ( छाया उत्तम…

