पालम (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य आणि राष्ट्रीय निष्ठा यांची वाढ होते . त्यातूनच जबाबदार नागरिक घडत असतात. असे प्रतिपादन राष्ट्रीय रत्न भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी केले .
तालुक्यातील जवळा येथे माधवराव पाटील महाविद्यालय पालम च्या रोसयोचे वार्षिक विशेष शिबीर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून भाई तुषार गोळेगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विनोद पवार , सरपंच महानंदा खटींग.प्राचार्य डॉ . एच.टी. सातपुते , उपप्राचार्य डॉ.ए.डी आरसुळे व मुअ आनंद गिजे यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना भाई लक्ष्मणराव गोळेगावकर म्हणाले की, शिबीर ग्रामीण भागात होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विद्यार्थांना कळतील.येणाऱ्या काळात ग्रामीण विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा .
यावेळी सर्व मान्यवरांचे भाषण झाले.कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमा धिकारी डॉ. गोवर्धन उरकुडे यांनी केले.तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. मोहन डमरे यांनी मानले .यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांची ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती .
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


