परभणी (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील पारवा येथे दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याची घटना होऊन पंधरा दिवस उलटूनही तपास संथ गतीने सुरू असल्यामुळे या प्रकरणात जलद गतीने तपास करून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन केली आहे.
पारवा येथे दिनांक 3 जानेवारीला एका शेत आखाड्यावर दरोडा टाकून तिघांना मारहाण करण्यात आली तर एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला ही घटना घडल्यानंतर या घटनेचा तपास संथगतीने सुरू आहे अजून एकाही आरोपीला पकडले नाही त्यामुळे जलद गतीने तपास करून तात्काळ आरोपींना पकडावे तसेच गरीब पीडित कुटुंबाला शासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली यावेळी आमदार डॉक्टर पाटील यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष ऍड.मंचकराव सोळंके, डॉक्टर राजू सुरवसे संजय गाडगे सुभाष जावळे कणके सर अरविंद देशमुख दिनेश बोबडे विठ्ठल तळेकर प्रशास ठाकूर गजानन काकडे ऍड. ढोबळे आदी उपस्थीत होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.


