परभणी (प्रतिनिधी) 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा संपन्न होत आहे.. या मेळाव्याच्या निमित्तानं पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी दिली..
31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून रॅलीला सुरूवात होईल.. रॅली शिक्रापूर, शिरूर, नगर, जामखेड, कडा, आष्टी, पाटोदा फाटा, बीड, वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रात्री 8 वाजेपर्यंत सेलू येथे पोहोचेल.. पुणे ते सेलू हे अंतर अंदाजे 350 किलो मिटर एवढे आहे.. पुणे येथून रॅली निघाल्यानंतर मार्गावरील तालुका संघांनी गावातील प्रमुख व्यक्ती सह रॅलीचे स्वागत करावे अशी अपेक्षा आहे.. तसेच मार्गावरील पत्रकार संघांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.. रँली मध्ये किमान 25 गाड्या असाव्यात आणि त्यावर परिषदेचे ध्वज तसेच चलो सेलू अशा मजकुराचे बँनर्स असावेत.. रॅलीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, खजिनदार मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजीटल मिडीयाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गणेश मोकाशी, रवी उबाळे आदी परिषदेचे पदाधिकारी सहभागी होतील..रॅली सेलू येथे पोहोचल्यानंतर परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, सेलू तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल, इलियास आणि अन्य पदाधिकारी रॅलीचे स्वागत करतील..


