परभणी,(प्रतिनिधी) : येथील बाल विद्यामंदिर हायस्कूलचा विद्यार्थी अनुज आशिष कवठेकर याची गुजरात येथे होणार्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेतून 14 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राचा संघ निवडी करिता निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर या विभागातून महाराष्ट्र संघाच्या निवडीकरिता खेळाडू आले होते. अनुजने औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत अतिशय उत्कृष्ट खेळी करून महाराष्ट्र संघात आपली निवड सार्थ ठरवली.
विजयी खेळाडूंसह क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर पंडित, संतोष देशमुख, प्रभाकर गमे यांचे संस्था अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर उपाध्यक्ष अॅड. विलासराव पोहंडूळकर, सचिव डॉ. विवेक नावंदर, सहसचिव अॅड. संजय देशपांडे, कोषाध्यक्ष विनय नावंदर, सदस्य अॅड. अशोक सोनी, एम.जी. विहीटकर, पवनकुमार झांजरी, सौ. अनिता नावंदर यांच्यासह सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक प्रदीप रुघे, बळीराम कोपरटकर, सीमा बोके यांनी अभिनंदन केले असून गुजरात येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


