परभणी ( प्रतिनिधी) पक्ष्यांना स्वतःची भाषा असते. पक्षी हे माणसाचे मित्र असतात. ते मानवाला नेहमीच मदत करत असतात. पक्ष्यांना दुःख , वेदना , सुख याची जाणीव होणारी भाषा समजत असते. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट करण्यापेक्षा त्याचे संवर्धन करण्यासाठी मनुष्यांनी संवर्धक झाले पाहिजे. त्यासाठी पक्ष्यांच्या बाबतीत आपण नेहमी संवेदनशील असले पाहिजे.* असे प्रतिपादन पक्षीमित्र माणिक पुरी यांनी केले.

चतुरंग प्रतिष्ठान , परभणी व बाल विद्यामंदिर हायस्कूल , वैभव नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व्याख्यानमालेत माणिक पुरी *पक्षी येती अंगणी* या विषयावर बोलत होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अरुण बोराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर जिजाऊ ज्ञानतीर्थची बालव्याख्याती कु. स्नेहल निलवर्ण व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पानखडे साहेब आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माणिक पुरी म्हणाले की , *भारतात प्राचीन काळापासूनच अनेक पक्षी अभ्यासक संशोधक होऊन गेले आहेत. त्यांनी अनेक निरीक्षणे करून पक्षांविषयी माहिती लिहून ठेवली आहे. पक्ष्यांची सेवा करणारे डॉ. रणजीत लाड सारखे डॉक्टर आहेत म्हणून पक्षी जिवंत दिसतात. दुसऱ्याच्या पोटाचा सुद्धा विचार करायचा असतो. या भावनेतून पक्षी व पक्षांसाठी निसर्ग समृद्ध करावा. कारण काही पक्षांच्या विष्टेतून पडलेल्या बियांमधून वृक्षांची उगवण होते. त्यामुळे वृक्ष वाढ होते. म्हणून पक्षी एक प्रकारचे वृक्ष संवर्धक आहेत.*
*पक्षी शेतातील पिकावरील किटके, आळ्या खातात त्यामुळे एक प्रकारची ते शेतकऱ्यांची सेवा करतात. पक्ष्यांच्या मनाविरुद्ध झाले की पक्षी अस्वस्थ होतात. पक्ष मित्र सलीम अली म्हणतात , माणूस मेला तर पक्षांना फरक पडत नाही परंतु पक्षी वाचले नाहीत तर माणूस जिवंत राहणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी डॉक्टर सलीम अली मारुती चित्तमपल्ली किरण मोरे किरण पुरंदरे यासारख्या पक्षी अभ्यासकांचे पुस्तके वाचून पक्षी अभ्यासाकडे वळावे. पक्ष्यांचे मित्र होऊन जीवन जगण्याचा आनंद घ्यावा. प्रत्येक गोष्ट मार्क मिळवण्यासाठी नसते काही गोष्टी जगण्यासाठी करायच्या असतात.* असे प्रतिपादन केले.तर कु. स्नेहल नीलवर्ण हिने *स्त्रियांच्या प्रश्नावर व सद्यःस्थितीवर आपले मत मांडले. स्त्रियांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. स्त्रियांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर जिजाऊ सावित्री यांचा आदर्श घेउन मोठे झाले पाहिजे* असे विचार मांडले.
प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी *चतुरंग प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुभाष ढगे यांनी केले. तर आभार बाळाभाऊ दंडवते यांनी मानले.


