परभणी,( प्रतिनिधी) संविधान सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन तत्त्वे वेगळी नाहीत. या तिघांच्या मिळून एक संघ आहे या तिघांची एक त्रिगुणात्मक मूर्ती आहे. ती एकमेकापासून अलग करण्याच्या प्रयत्न केला तर लोकशाहीचा मूळ हेतू नष्ट होईल. या देशातील चार्वाक, बुद्ध, कबीर, महावीर, तुकोबाराया, शाहू महाराज, शिवराय, महात्मा फुले, यांचा समता मुलक वारसा पुढे चालवीत जगातील सर्वात मोठे राज्यघटना देशाला बहाल केली. आधुनिक भारताला त्यांनी समितीच्या धाग्यात गोखले त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय संविधान सामाजिक समतेचा परिपाक होय असे प्रतिपादन डॉ. रमेश शिंदे यांनी केले.
विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व युगांधर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्पगुताना ते बोलत होते. डॉक्टर गोविंद कांबळे धनंजय जाधव नरेश कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. बळीराजा नगर कारेगाव येथे संपन्न झालेल्या व्याख्यानमालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या विषयावर प्राध्यापक डॉक्टर रमेश शिंदे यांनी विस्तृत मांडणी केली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व्याख्या उद्घाटन संपन्न झाले. प्रास्ताविक युगांधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव अढागळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाकर कांबळे यांनी रभार शिवाजी जोंधळे यांनी मांडले. व्याख्यानमाला संपन्न झाल्या प्राध्यापक डॉ रमेश शिंदे यांनी २० मिनिटे उपस्थित अशी सोप्या पद्धतीने संवाद साधला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान जाधव, अक्षय ताजने, बाबाराव इंगोले, मंगेश आगलावे, प्रकाश जावळे, धम्मदीप शेजुळे, नागनाथ आढाव आणि कारेगाव येथील नागरिकांनी प्रयत्न केले.


