परभणी,(प्रतिनिधी) आर पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे टीबी स्क्रीनिंग सेंटर व फिजिओथेरपी शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी आ. डॉ.राहुल पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अशोक सोनी, डॉ. विवेक नावंदर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रुबा घाडगे,संदीप भंडारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी डॉ. संजय हरबडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक विठ्ठल रणबावरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किरण सगर, प्रा. डॉ. संतोष हरकळ, डॉ. जयदेव उघडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री दर्डा म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम डॉ.राहुल पाटील आणि आरपी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून सुरू आहे, मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेले आ. डॉक्टर राहुल पाटील यांचे कार्य गौरवास्पद आहे. टीबी स्क्रीनिंग सेंटर असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,आंतरराष्ट्रीय स्तरावर फिजिओथेरपीची मागणी वाढली आहे, यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी होत आली आहे. सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार घेणे परवडत नाही, अनेक रुग्ण आजारपण आपले अंगावर काढतात यासाठी अशा रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते व रुग्णालयाच्या या महत्त्वपूर्ण विधायक भूमिकेचे करावे तितके कौतुक कमी आहे, या सेंटरमुळे सर्वसामान्य गरजू रुग्णांना याचा लाभ मिळेल असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. यावेळी आमदार पाटील यांनी क्षयरोगाच्या लवकर निदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे त्यावर योग्य उपचार सुरू केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात टी.बी. स्क्रीनिंग सेंटरच्या मुळे स्थानिक नागरिकांना यापुढे अधिक सोयीस्करपणे तपासणी मिळेल व टी.बी.च्या लढ्यात अधिक प्रभावीपणे काम करता येईल फिजिओथेरपी शिबिरात विविध शारीरिक दुखण्यावर उपचार करण्यासाठी तान तणाव कमी करण्यासाठी विविध तंत्रे फिजिओथेरपीच्या आधुनिक पद्धती विषयी मार्गदर्शन करण्यात येईल असे यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे राहुल कांबळे स्वप्निल बोर्डे विशाल आहेर राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.


