पूर्णा (प्रतिनिधी)स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक घेऊन आंदोलन करण्याचे ठरवले अखेर दिनांक 18 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता धानोरा काळे फुलावर जल समाधी आंदोलना ला सुरूवात झाली. हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने एक तास चर्चा केली पण तोडगा निघाला नाही.अखेर ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरूवात केली

जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापुस, मुग, उडीद यांन सारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पुर्ण केले जिल्ह्यातील सर्वच महसुलमंडळ अग्रिम रक्कमेस पात्र ठरली. असुन देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तसेच अतिवृष्टी रक्कम सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. स्वाभिमानीने पीक विमा कंपनीला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले राज्य सरकारने विम्याचा हप्ता दिला नसल्याने आम्ही विम्याची रक्कम देऊ शकत नाहीत. अशी खोचक भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील बापलेकाचा पीक विमा मिळाला नसल्यामुळे मृत्यू झाला. पिक विमा वेळीच भेटला असता तर बाप लेकराचा जीव वाचला असता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक घेऊन आंदोलन करण्याचे ठरवले अखेर दिनांक 18 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता धानोरा काळे फुलावर जल समाधी आंदोलना ला सुरूवात झाली. हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने एक तास चर्चा केली पण तोडगा निघाला नाही.अखेर ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरूवात केली
त्या अनुषगाने प्रशासनाचे अधिकारी पोलीस उप अधीक्षक पाटील,ताडकळस पोलीस स्टेशनचे मोरे, नायब तहसीलदार थारकर , तालुका कृषी अधिकारी भालेराव व पिक विमा कंपनीचे कर्मचारी, यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यासाठी बराच वेळ प्रयत्न चालू होते. पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांन कडून आंदोलक लेखी घेण्यावर ठाम होते. हे आंदोलन 3 तास चालु राहिले जो पर्यंत लेखी आश्वासन भेटत नाहीं तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत ही आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका होती. पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व जिल्हाधिकारी यांनी परभणी जिल्ह्याच्या मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधून आंदोलकांसोबत फोनवरती संवाद साधून दिला. व त्यांनी आश्वासन देऊन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी भेटून पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी अखेर आंदोलन मागील घेतले. यावेळी उपस्थित
किशोर ढगे, रामप्रसाद गमे, पंडित भोसले ,गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, गंगाधर दादा पवार ,कैलास काळे , नामदेव काळे, मुंजाजी काळे, भुजंग काळे, बद्रीनाथ काळे, सुरेश काळे, गोविंद काळे,राम गोळेगावकर, प्रसाद गरुड, नागेश दुधाटे, विष्णू दुधाटे, सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
*”भुके पोटी आंदोलकांनी घेतला पाण्यातच आस्वाद**
धानोरा काळे पुलावर तीन तास जल समाधी आंदोलन चालू होते बराच वेळ आंदोलन चालू होते नदीपात्राच्या अधोमध गेल्या मुळे काही काळ प्रशासनाची कर्मचाऱ्यांना देखील रेस्क्यू टीमच्या आधारे पाण्यामध्ये उतरावे लागले आणि काय आंदोलकांना वर काढले यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आपल्या मागण्यावर आंदोलक ठाम होते अखेर आंदोलकांनी अशी भूमिका घेतली की न्याय मिळेपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाहीत भले रात्र वैऱ्याची काढू ही भूमिका घेतली होती त्यातच काही आंदोलकांनी भुकेपोटी बिस्किट खाण्याचा पाण्यातच आस्वाद घेतला. शेवटच्या टोकापर्यंत नेले शेवटी राज्य मंत्री यांच्या आश्वासनाने स्वाभिमानीने आंदोलन मागे घेतले.


