परभणी (प्रतिनिधी) येथील रहिवासी व पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या रिया विकास मिश्रा हीने महाकुंभमेळा येथे रेखाटलेल्या वास्तुशिल्पाच्या प्रती कृतीबद्दल आ.डॉ.राहुल पाटील यांनी शनिवारी तिचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यातील जुना आखाडा श्री महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज यांच्यासाठी अनुष्ठान भवन, मुख्य मयुरेश्वर प्रवेशद्वार, भोजन कक्ष आदींचा आराखडा तयार करण्याचे काम रीया हीने यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या अहमदाबादच्या सारांश स्टुडिओ येथील चॅरिटी प्रोजेक्ट अंतर्गत इंटरनशिप करताना तिने या डिझाईन तयार केल्या आहेत. तिच्या या उल्लेखनीय कार्याचा आ.पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
यावेळी तिचे वडील महावितरणचे उपव्यवस्थापक विकास मिश्रा,आई शर्मिली मिश्रा,आजी अनिता मिश्रा, प्रसाद सिंगणापूरकर, सतीश सातोनकर, प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते.


