पालम(प्रतिनिधी) दीपगंगा भगीरथीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील साहित्य, काव्य, आरोग्य क्षेत्रात, प्रशासकीय अधिकारी, उद्योग, शिक्षण ,क्रीडा ,कायदा, युवा क्षेत्रामध्ये व्याख्याते म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा दीपगंगा भगीरथी सेवाभावी संस्थांच्या वतीने प्रत्येक वर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो .
2024 साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून तब्बल 2286 प्रस्ताव संस्थेच्या वतीने मागवण्यात आले. त्यामधून सोळा विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक 20 जानेवारी रोजी शाहू स्मारक, दसरा चौक ,कोल्हापूर या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, समजकल्याण उपयुक्त विशाल लोंढे , जिवंज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबई यांचे मा. हरखचंद सवलासर प्रमुख वक्ते युवराज पाटील, सरभिनेते अमर देवकरसर, सौ.शारदा लोंढे पूरस्कारकर्ते , संस्थेचे अध्यक्ष हिंदरत्न साहित्यक दिपक लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आले.पालम तालुक्यातील चोरवड या ग्रामीण भागामधील रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज पिंपरीगाव येथील रसायनशास्त्राचे अद्यापक प्रकाश रावण साबणे यांना दिपगंगाभागीरथी राज्यस्तरीय शिक्षक गुरुरत्न, उच्च अलौवकिक मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दलरयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज पिंपरीगाव महाविद्यालयचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी, सर्व सदस्य, रयत शिक्षण संथा पश्चिसम विभागीय कार्यालय, येथील सर्व पद अधिकारी औंधगाव पुणे यांनी पुरस्कारा मिळाल्या बदल प्रकाश साबणे यांचे अभिनंदन केले.


