Author: Lok Sanchar

शेतकरी कामगार पक्षाचे जोरदार आंदोलन परभणी,(प्रतिनिधी) शहरातील दर्गा रस्त्यावरील हाजी हामीद कॉलनीत  सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी शेतकारी कामगार पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने गुरुवारी (दि.10) जोरदार आंदोलन करण्यात आले. दर्गाह रस्त्यावरील पारवा गेटजवळील हाजी हमीद कॉलीनीत रहिवाशांचे वीजेअभावी प्रचंड बेहाल होत आहेत. चार-चार दिवस वीज पुरवठा खंडीत राहत असून या भागातील पोलचे अंतर तसेच लोंबळणार्‍या तारांमुळे विलक्षण स्थिती निर्माण झाली आहे. आधीच या भागातील नागरीक मूलभूत सोयी-सुविधांअभावी हैराण असतांना महावितरण कंपनीच्या या दररोजच्या त्रासामुळे नागरीकांचे जीवन असह्य झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक आघाडीचे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : कुल जमाती तंजीम या संघटनेस 11 ऑक्टोंबर रोजी आयोजित धरणे आंदोलन नवरात्र महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यास भाग पाडावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.10) जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. मागील दोन महिन्यांपासून पुजनीय संत रामगिरी महाराज तसेच पुजनीय नरसिंहनंद महाराज यांना हेतुतः टार्गेट केले जात आहे. विशेषतः परभणीतही या संघटनेने हिंदुसाठीच्या पवित्र नवरात्रीच्या सणात जाणीवपूर्वक धरणे आंदोलन पुकारले आहे. हिंदु माता भगिणी, युवक, अबालवृध्द हे आनंदोत्सव साजरा करत असतांना हिंदुंच्या या सणास आंदोलनाद्वारे हा गालबोट लावण्याचाच एक प्रकार आहे, असे विश्‍व हिंदु परिषदेच्या या शिष्टमंडळाने नमूद केले. गुरुवारी सकाळी न्यू भारत मटण शॉप या…

Read More

मुंबई: ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी(दि ९)  सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. काहीवेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. lरतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी संध्याकाळी त्यांची…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (दि.09) मुंबईतून विधानसभा मतदारसंघांतर्गत दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात परभणी मतदारसंघातून माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला यांना उमेदवारी  जाहीर करण्यात आली. आज  बुधवारी (दि 9) वंचित बहुजन आघाडीने मुंबईतून दुसरी यादी जाहीर केली. त्या यादीत परभणी विधानसभा मतदार संघा साठी माजी उपमहापौर माजू लाला यांना उमेदवारी जाहीर केली.  गेल्या चार महिन्यांपूर्वीच माजू लाला हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले होते. परंतु, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर माजू लाला यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली.

Read More

परभणी,( प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (दि.09) मुंबईतून काही विधानसभा मतदारसंघांतर्गत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यात परभणी मतदारसंघातून माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आज बुधवार (दि.9) मुंबईतून दुसरी यादी जाहीर केली. त्या यादीतून या आघाडीने माजी उपमहापौर माजू लाला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या चार महिन्यांपूर्वीच माजू लाला हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले होते. परंतु, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर माजू लाला यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे परभणी मतदान संघात आता चर्चा होत आहे.

Read More

पालम (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षनिरीक्षक परभणी सुभाष सोळुंके,संपर्कप्रमुख मा.सुरेशदादा जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर साहेबराव शिंदे यांची पालम युवासेना तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्षनिरीक्षक सुभाष सोळुंके यांनी नियुक्ती पत्रक देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम,व्यंकटराव शिंदे,महिलासेना जिल्हाप्रमुख जनाबाई मुंडे,गीताताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख एकनाथराव लोखंडे, चंद्रकांत पाटील सुर्यवंशी विधानसभा प्रमुख गंगाखेड, शिवाजीराव शिंदे विधानसभा समन्वयक, रमेश सातपुते तालुकाप्रमुख गंगाखेड, भाऊसाहेब पौळ तालुकाप्रमुख पालम, प्रकाशराव कराळे तालुकाप्रमुख पूर्णा, विशाल किरडे शहरप्रमुख पूर्णा,अर्जुन पूर्णाळे शहरप्रमुख गंगाखेड, तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयात खो खो स्पर्धा पार पडल्या.14 17 आणि 19 वर्षे वयोगटातील स्पर्धेचे उद्घाटन म.न.पा. सहाय्यक प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीका र्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे उपस्थित होते.या वेळी बोलताना कांबळे म्हणाले, मैदानी खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळ खेळले पाहिजेत असे सांगत त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.डॉ. कोकीळ म.न.पा. क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, राजाभाऊ कामखेडे,प्रा. राजू रेंगे,जिजाऊ ज्ञानतीर्थ कैलास टेहरे, स्वीस अकॅडमी बालाजी मानोलीकर, अरबिंदो अक्षरज्योती तुकाराम शेजुळ, वरद विद्यालय कपिल निलवर्ण, आकाशकन्या निलेश राठोड, वसंतराव नाईक अमरदीप…

Read More

परभणी (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने व आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात इंजि. सुहास पंडित यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,रामभाऊ घाडगे,माजी उपमहापौर भगवानदादा वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, माजी महापौर रवी सोनकांबळे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भिसे तसेच परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले

Read More

परभणी ( प्रतिनिधी) आधुनिकतेच्या जमान्यात टपालाचे पत्र कालबाह्य होवू लागले आहे. पूर्वी खुशाली कळवायची म्हटलं की, पत्रा शिवाय पर्याय नव्हता. आता मात्र काळ बदलला आणि सोशल मीडियाचा जमाना आला. त्यामुळे पोस्टाच्या पत्रातील सप्रेम नमस्कार, विनंती विशेष हा नव्या पिढीला अपवादानेच माहिती आहे.  मात्र खऱ्या अर्थाने मामाचे पत्र मात्र हरवलं. पण असले तरी बदलत्या जमान्यात बदलाचे आव्हान टपाल विभागाने स्वीकारुन अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची टपाल हीच आपल्या संपर्काचे आणि संवादाचे प्रमुख माध्यम होते. पत्र लिहिण्यास कारण की…या सुरुवातीच्या वाक्याने सुरूवात व्हायची अन संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळवायची. पोस्टमन आल्यास त्याच्यामागे…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : संबंधित विभाग प्रमुखांनी शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शाळा, अंगणवाडी येथे भेटी देवून नियतन, उचल व वाटपाचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, अशी सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली. यावेळी राज्य अन्न आयोगाचे सचिव प. फ. गांगवे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, शिधा वाटप निरीक्षक बाजीराव तंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सुनिल पोलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकिारी कैलास तिडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विकास मुसळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विशाल जाधव, प्रांत अध्यक्ष ग्राहक पंचायत विलास मोरे, शिक्षण समिती प्रमुख देवगिरी प्रांत…

Read More