परभणी (प्रतिनिधी) येथील पाथरी रस्त्यावरील परभणी मेडिकल कॉलेज येथे सर्व डॉक्टरांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) अंतर्गत प्रशिक्षणाचे सत्र घेण्यात आले.
हे प्रशिक्षण वैद्यकीय कागदपत्रांचे सुसूत्रीकरण व मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ (MCCD) नियमांच्या पालन सुधारण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत सर्व डॉक्टरांसाठी आणि दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत सर्व परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे सत्र घेण्यात आले.
यावेळी परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, प्रशासकीय अधिकारी गुणवंत आहिरे, मुख्य समन्वयक डॉ.रोहन बेंबरे, डॉ.ओमप्रसाद दामकोंडवर यांची उपस्थिती होती. यावेळी सहभागी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जन्म-मृत्यू नोंदणी, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व अद्ययावत मानकांची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान, कर्मचाऱ्यांना जन्म-मृत्यू नोंदणी, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व सुधारित प्रणालींची माहिती देण्यात आली, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील माहिती नोंदणी प्रक्रियेत बदल अपेक्षित आहे. हे पाऊल परभणी मेडिकल कॉलेजने वैद्यकीय कागदपत्रांचे उच्च दर्जा राखण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्य सुधारण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.


