परभणी (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा संपन्न होत आहे.. या मेळाव्याच्या निमित्तानं पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार आहे. सेलू येथे आल्यानंतर जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीने या रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे.
शुक्रवारी 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून रँलीला सुरूवात होईल. ही रॅली शिक्रापूर, शिरूर, नगर, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा , बीड, वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रात्री 8 वाजेपर्यंत सेलू येथे पोहोचेल. पुणे येथून रॅलीचे निघाल्यानंतर मार्गावरील तालुका संघांनी गावातील प्रमुख व्यक्ती सह रँलीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या मार्गावरील पत्रकार संघ देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
या रॅलीमध्ये एस.एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, शिवराज काटकर, मन्सूरभाई शेख, संदीप कुलकर्णी, अनिल वाघमारे, गणेश मोकाशी, रवी उबाळे आदि परिषदेचे पदाधिकारी सहभागी होतील. ही रॅली सायंकाळी सेलू येथे आल्यानंतर परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, राजू हट्टेकर, विठ्ठलराव वडकुते यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहमद इलियास, कांचन कोरडे, शेख मोहसीन, संजय मुंडे, निसार पठाण, रेवणअप्पा साळेगावकर, दिलीप मोरे, सतिष आकात, निरज लोया, अबरार बेग आदींसह पत्रकार स्वागत करणार आहेत. यासाठी पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आल ेआहे.
Saturday, August 22
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


