संबर येथील श्री दत्तात्रय महादेव देवस्थानला निधी मिळणार
परभणी:(प्रतिनिधी): जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेल्या संबर येथील श्री दत्तात्रय महादेव संस्थान मंदिर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होते, पर्यटन विकास योजनेंतर्गत दीड कोटी रुपये निधी शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागणार आहे. त्यामुळे देवस्थान परिसराचे सुशोभीकरण होऊन हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे.
परभणी जिल्ह्यात जी मोठी देवस्थाने आहेत, त्यातील पुरातन श्री आनंदी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र संबर हे इ.स.१५१७ मधील असून जवळपास ५०८ वर्षांपूर्वीचे आहे. या देवस्थानला विदर्भ, मराठवाडा, खानदेश व शेजारील राज्यांतूनही भाविकांचा दर्शनासाठी मोठा ओघ सुरू असतो. मोठे देवस्थान असतांनाही राज्य शासनाने हे ठिकाण ‘क’ वर्ग पर्यटनमध्ये समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या पर्यटन विकास योजनेतून या ठिकाणी विकासकामांना निधी मिळत नव्हता. शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी हे देवस्थान ‘क’ वर्ग पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केला.
त्यानुषंगाने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली या भेटीत मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता परभणी येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
परभणी जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून या स्थळांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी परभणी मधील संबर येथील श्री दत्तात्रय महादेव संस्थान मंदिर येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीड कोटी रुपये, आसोला येथील मारोती मंदिर एक कोटी व विठ्ठल रुखमाई मंदिर पन्नास लक्ष रुपये, खळी येथील खंडोबा मंदिर व तेल्या मारोती मंदिर परिसरामध्ये पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांसाठी दोन कोटी रुपये, अशी एकूण पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मंजूर निधीतून विकासकामांतुन पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


