परभणी(प्रतिनिधी) :उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या अंतीम मुदतीत सोमवारी (दि.04) रोजी परभणी विधानसभा मतदारसंघातून 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले असून त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघात या एकूण 46 उमेदवारांनी 59 नामनिर्देशन दाखल केले होते त्यात छाननी दरम्यान 37 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी 22 उमेदवारांनी माघार घेतली.
अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष), विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), विनोद ज्ञानेश्वरराव रसाळ (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), शेख रफीक अहमद (अपक्ष), अतिश बापूराव गरड (अपक्ष), सय्यद अतीक उर रहमान सय्यद अमीर (अपक्ष), माजी महापौर सौ. अनिता रविंद्र सोनकांबळे (अपक्ष), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), सुरेश लक्ष्मणराव बनसोडे (अपक्ष), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), रमेश सदाशिव देशमुख (अपक्ष), सय्यद फारूक अली उर्फ बाबा (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (अपक्ष), अलि खान मोईन खान (अपक्ष), महेबुब खान साहब (अपक्ष), सय्यद नोमान हुसेन कौसर (अपक्ष), शेख सलीम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.


