परभणी( प्रतिनिधी) परभणी महानगरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून शहरभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, तसेच प्रदेश व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. विविध आघाड्या व प्रकोष्ठांचे पदाधिकारीही उत्साहात सहभागी झाले. यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान मोर्चा तसेच कायदा, प्रज्ञा, वैद्यकीय, शिक्षक, शिक्षण संस्था, भटके-विमुक्त, अपंग विकास, ज्येष्ठ कार्यकर्ते, झोपडपट्टी सेल, कामगार, व्यापारी, सहकार, सांस्कृतिक, उद्योग, आध्यात्मिक, जैन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माजी सैनिक, पंचायतराज, ट्रान्सपोर्ट आणि पदवीधर प्रकोष्ठ यांचा समावेश होता.
या सोहळ्यात जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ कार्यकारिणी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि भाजपा प्रेरित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली ॲड. एन. डी. देशमुख, मोकींद खिल्लारे, डॉ. केदार खटिंग, श्मोहन कुलकर्णी, भालचंद्र गोरे, कमलकिशोर अग्रवाल, संजय रिझवानी,. दत्तात्रय दैठणकर, सौ. मंगलताई मुदगलकर,. मधुसूदन जोशी, सुरज चोपडे, सौ. मनीषा जाधव, हम्मु चाऊस, शेख निहाल, मोहम्मद गौस, अब्दुल हमीद, . संदीप कोकडवार आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या या विजयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हा विजय म्हणजे जनतेचा विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळालेला कौल आहे. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांनुसार काम करून पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प केला. या जल्लोषाने परभणी शहरात राजकीय उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


