परभणी,(प्रतिनिधी) : जिंतूर रस्त्यावरील तलरेजा टॉकीजजवळील तूळजाभवानी मातेच्या मंदिराजवळील मटन खानावळ तात्काळ बंद करावी, अशी मागणी संतप्त नागरीकांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांसह महानगरपालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या मंदिर परिसरात या मटन खानावळीचे घाण पाणी महानगरपालिका वाहत येत आहे. या खानावळीचे हे पाणी महापालिका प्रशासनाने व संबंधितांनी हेतुतः मंदिराच्या दिशेने काढले आहे. नाली बांधकामासाठी मनपा प्रशासनाने मंदिरासमोरील पायर्या काढून टाकल्या आहेत. नाली करतांना प्रशासनाने नालीच्या पाण्याची दिशाही मंदिराच्या समोर विरुध्द दिशेने केली आहे. त्याच दिशेकडून या मटन खानावळीचे म्हणजे हॉटेलचे पाणी मंदिरासमोरुन वाहत आहे. हे दुषित पाणी मंदिरासमोरुन वाहत असल्यामुळे हिंदु समाजाच्या नागरीकांनी वारंवार आक्षेप घेतला परंतु, प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदु समाजबांधवांच्या भावना ओळखून महापालिका प्रशासनाने संबंधित खानावळ, हॉटेल तात्काळ बंद करावी व पाण्याची दिशा पूर्णतः बदलावी, अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली.
या निवेदनावर संजय हिंगमोड, संतोष दोडके, प्रभाकर गाडेकर, राजू साबळे, संतोष साबळे, गजानन राऊत, दिलीप सातपुते, शिवाजी कांबळे, राजू गायकवाड, संजय गायकवाड, सतीश फटके, अनिल गायकवाड, केशव गायकवाड, राम दिवसे, दत्ता दैठणकर, माणिक सुरवसे, विजय आळणे, सुरेश फाटके, राजू मिसाळ, बाळू घांगळे यांच्यासह अन्य नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.