परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मद्य विक्रेते 20 मार्च रोजी आपले बीआर बार बंद करून सरकारकडून होत असलेल्या कर वाढीच्या निषेधार्थ आपला निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्रातील परंमिट धारकांच्या मद्यविक्री वर सरकार कडून सरसकट दहा टक्के अतिरिक्त व्हॅॅट आकारला जात आहे. हा व्हॅट थेट मद्य उत्पादकांवर आकारला जावा, जेणेकरून शासनाचे उत्पन्न वाढेल, या कर आकारणी निषेधार्थ २० मार्च 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व बार बंद राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा बार हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने ,आनंद बाकळे फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स महाराष्ट्र यांनी दिली.
ग्रामीण व शहरी भागामध्ये हातगाडे, धाबे, हॉटेल्स येथे अनाधिकृतपणे मद्यविक्री मोठया प्रमाणावर होत आहे. त्यांच्यावर दारुबंदी विभागाकडून किंवा पोलिसांकडून कारवाई होतांना दिसत नाही कधीतरी थातूर मातूर कार्यवाही केलीच तर परंतु अत्यंत कमी दंडात्मक कारवाई असल्यामुळे हे अनधिकृत व्यवसाय वारंवार वाढत चालले आहेत. तर काही जण चक्क वाईन शॉप वरून दारू घेवून रस्त्याच्या बाजुला झाडाखाली किंवा एखादा शेतामध्ये निवांत पितांनाचे चित्र अनेक्दा दिसू लागले आहे.
यावर शासनाकडून कोणतेही कडक कारवाई होताना दिसत नाही. परमीट रूम व्यावसायिक शासनाचा महसूल भरून व्यवसाय करीत आहेत. सरकारने उत्पादक, वितरक, किरकोळ परमीट रूमधारक या सर्वांना सारखीच कर प्रणाली जर लागू केली तर सरकारचा महसूल वाढू शकेल. वाइन शॉप यांना व्हॅट न आकारता सर्व कर उत्पादकांकडून वसूल करावा, जेणेकरून परमीट रूमधारकांनाही योग्य दराने मद्य विक्री करता येईल.
यावेळी आनंद बाकळे फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स महाराष्ट्र, संघाचे उपाध्यक्ष अरुण भीसे (परभणी), दिपक तलरेजा,भाऊ सोनवणे अध्यक्ष सेलू, सतीश नवले,शिवाजी डोळे (गंगाखेड), उत्तमराव चव्हाण, राजु बरंगे, दिपक गोल्ड, राजेश मारवाडी, बेंबाळकर सतीश, संजय डेंबरकर, सखाराम , हॉटेल सावली सेलू, विवेक संगमे, शंकरराव तळेकर, किशन रसाळ, रंजीत गायकवाड, शेरेकर, आर. के. बोरा आदी उपस्थित होते.