परभणी (प्रतिनिधी) आपण समाजाचं देणं लागतो ही गोष्ट लक्षात घेऊन सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन गरजवंतास जमेल तशी मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी झटणार व्यक्तिमत्व तसेच मागील 14 वर्षापासून आरोग्य सेवा न्यू लाइफ ब्लड बँकेच्या माध्यमातून अविरत देत असताना लाखो जीवन वाचवण्याचे कार्य करत असलेले डॉ.पंकज खेडकर यांना आधार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बेळगाव नॅशनल एक्सप्रेस गोल्ड स्टार अवॉर्ड 2025 यांनी *आदर्श समाजरत्न* गौरव पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथील प्रदान करण्यात आला
कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज डॉ.दिलीप नेवसे सोलापूर , प्रा. डॉ.पांडुरंग पाटील प्रसिद्ध व्याख्याते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कोल्हापुरी फेटा मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आला .