परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगर पालीकेच्या वतीने जिल्हा शालेय स्पर्धा वय गट 14-17-19 45 स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत 2725 विद्यार्थ्यानी भाग घेतला. शहरातील 80 शाळेच्या विद्यार्थ्यानी भाग घेतला. मनपाच्या वतीने स्टेडियम मैदान श्री शिवाजी महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय,डॉ. झाकीर हुसैन , बॅडमिंटन हॉल, सिटीक्लब , न्यु. ज्योर्तिगम इंग्रजी शाळा अशा शाळेत स्पर्धा घेण्यात आल्या यात आज दि. 26 रोजी मनपाच्या मुख्य कार्यालयात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 150 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी आयुक्त धैर्यशील जाधव यांनी शहरातील शालेय खेळाडुंसाठी याही असे सहकार्य करणार तसेच मनपाच्या वतीने ग्राउंड उपलब्ध करून देणार असे स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सांगीतले. कॅरम…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण दि. 2610/2024 व 2710/2024 रोजी ऑडीटोरीय हॉल वसंतराव नाईक कृषी विदयापीठ परभणी येथे दोन सत्रामध्ये आयोजीत करण्यात आले होते. प्रथम सत्रात एकुण 560 अधिकारी, कर्मंचारी यांचे पैकी 492 अधकारी, कर्मचारी हजर असून 68 कमेचारी गैरहजर होते. तसेच दुपार सत्रात एकुण 484 अधिकारी, कर्मंचारी यांचे पैकी 438 अधिकारी कर्मंचारी हजर असुन 49 कमचारी गैरहजर होते. सदर प्रशिक्षणसाठी उपस्थित सर्व नियुक्त अधिकारी , कर्मचारी यांना दतू बाळू शेवाळे निवडण्क निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच संदीप राजपूरे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार परभणी यांनी यथोचित मार्गदर्शन…
परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांपासून फरार असणार्या कलम 379 मधील गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग व नक्षल सेलच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आगामी सार्वत्रित निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात या दृष्टीने स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने विविध गुन्ह्यातील फरारी आरोपींविरोधात शोध मोहिम सुरु केली आहे. त्यात नानलपेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम 379 मधील गुन्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून फरार असणारा नंदू उर्फ नंदकिशोर उर्फ धर्मा अशोक वानखेडे यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व नक्षल सेलच्या पथकाने मेहकर तालुक्यातील मुळी या गावातून 24 ऑक्टोंबर रोजी सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपीची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिस निरीक्षक…
जिंतूर येथील सार्थक नवले याच्या कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय परभणी ( प्रतिनिधी) मेंदूमध्ये झालेल्या आंतर्गत रक्तस्त्रावामुळे ब्रेन डेड झालेल्या १८ वर्षीय युवकाच्या अवयवदानामुळे ३ गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. या तरुण रुग्णाच्या यकृताचे व दोन किडण्यांचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले. त्यामुळे ते लवकरच निरोगी आयुष्य जगू शकणार आहेत. अवयवदान केलेला ब्रेनडेड १८ वर्षीय युवक हा जिंतूर येथील रहिवासी होता आणि तेथे ज्ञानोपासक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. या संदर्भात अधिक माहिती देताना परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गषबाळे यांनी सांगितले की, “जिंतूर येथील १८ वर्षीय सार्थक प्रवीण नवले या रूग्णाचा मेंदू मृतवत झाल्याने नातेवाईकांनी…
परभणी (प्रतिनिधी) येथील राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी शारदा महाविद्यालय परभणीचे नवनियुक्त प्राचार्य डॉ.बबनराव पवार यांचा सत्कार व अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रमुख कार्य करणाऱ्या ‘विवेक वाहिनीचे’ उदघाटन असा दुहेरी कार्यक्रम पार पडला. राजर्षी शाहू महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विवेकदृष्टी जागृत व्हावी व प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव वाढीस लागावा या उद्देशाने ‘विवेक वाहिनीच्या’ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पुढे या कार्यक्रमाचे उदघाटक शारदा महाविद्यालय परभणी चे नवनियुक्त प्राचार्य डॉ.बबनराव पवार यांचा महाविद्यालय व संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विवेक वाहिनीचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. श्रद्धा खनपटे, सय्यद अखेद, कु.…
परभणी, (प्रतिनिधी) – आज शुक्रवार, दि 25 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 12 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत 50 उमेदवारांना 90 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्र सादर केले. 96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 7 उमेदवारांनी 9 अर्ज घेतले. तर सुरेश लक्ष्मणराव बनसोडे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 64 उमेदवारांना एकूण 107 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 4 उमेदवारांनी एकूण 5 नामनिर्देशन अर्ज…
परभणी, (प्रतिनिधी) जिल्हा निवडणूक विभाग आणि विश्वमांगल्य यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी परभणीतील महिला मतदार वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी गुरुवारी (दि.24) रामकृष्ण नगर येथे गेम शोचा कार्यक्रम पार पडला. परभणी जिल्हा मतदान जनजागृती कक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे 350 महिला मतदारांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते आणि जिल्हा मतदान जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मतदान जनजागृती कक्षाच्या स्वीप टीमच्या सदस्यांनी मतदान जनजागृतीसाठी संगीत आणि नाट्य आधारीत प्रभावी सादरीकरण केले. जिल्हा निवडणूक विभागामार्फत स्वीप अंतर्गत मतदार जागृतीची अनेक कार्यक्रम घेतल्या जातात परंतू एका जागरुक महिला…
पालम (प्रतिनिधी ) मराठवाड्यातील एकमेव बेट म्हणुन ख्याती असणारे परभणी जिल्ह्यातील पालम या तालुक्यातील निसर्गरम्य जांभूळ बेट येथे मागील कित्येक वर्षापासून पर्यटक हे येथील निसर्गरम्य वातावरण तथा येथील जोपासलेली विविध वृक्ष येथील गोदावरी पात्रात बोटिंगद्वारे पोचणे ही पर्यटकांच्या साठी एक पर्वणीच आहे येथे चारही बाजूंनी जांभळाच्या झाडांची गर्दी व मोरांचे थवे आणि इतर पक्ष्यांची वर्दळ पूर्वी पासून होती ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव मागील काही वर्षांपासून जांभूळबेट संवर्धन समिती चे अध्यक्ष कृषीभूषण कांतराव काका झरीकर यांच्या मार्गदर्शना मागील काही वर्षापासून मराठवाड्यातील हे एकमेव असणारे निसर्गरम्य जांभूळबेट या बेटाचा विकास व्हावा या उद्देशाने विकास होणे आवश्यक आहे पालम पासून ५ कि.…
हिंगोली (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यातील 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी तहसील कार्यालय, कळमनुरी जि.हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रसार माध्यम कक्षातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांना आज प्रशिक्षणामध्ये पेड न्यूज व इतर अनुषंगिक बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी माध्यम व प्रमाणन समितीची रचना, पेड न्यूज, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मिडीया यासाठी जाहिरातीचे प्रमाणन करणे तसेच त्याअनुषंगाने पाठवावयाचे अहवाल व त्यांच्या नमुन्याची माहिती, सोशल मिडिया व मुद्रीत माध्यमातील पेड न्यूज शोधणे व त्यावर कार्यवाही करणे आदी बाबींची माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली. तसेच पेड न्यूजबाबत वसमत येथील पत्रकारांनाही यावेळी या प्रशिक्षणात जिल्हा माध्यम व प्रमाणन…
पालम ( प्रतिनिधी) राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना ( कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळं जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध,लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी – विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्या साठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करुन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय…

