परभणी (प्रतिनिधी) जायकवाडीच्या जलाशयातून परभणी जिल्ह्यातील टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे सोमवारी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास हजारो कार्यकर्त्यांसह घेराव घालून टाळे ठोकणार आहेत.
जायकवाडीच्या जलाशयातून डाव्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. परंतु हे पाणी परभणी जिल्ह्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. परभणीच्या वरच्या भागातील काही उपद्रवी त्या त्या भागातील तलाव, सिंचन प्रकल्पांतून हे पाणी खेचून घेऊ लागले आहेत. त्याचा परिणाम जायकवाडी कालव्यातील पाणी परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या पुढे सरकेनाशे झाले आहे.यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर लाभ क्षेत्र, हजारो शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. आपण जायकवाडीच्या मुख्य अभियंत्यांना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, परंतु मुख्य अभियंत्यांनी त्याचे गांभीर्य अद्याप पर्यंत ओळखले नाही. अशी खंत खा.जाधव यांनी रविवारी परभणीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.
जायकवाडीच्या स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पूर्ण क्षमतेने पाणी पुरवण्यासंदर्भात वारंवार बोलल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेतल्या जात नसल्यामूळे सोमवारी जायकवाडीच्या कार्यालयास हजारो कार्यकर्ते व शेतकरी उद्या घेराव घालून टाळे ठोकतील ,जायकवाडीच्या अभियंता या ज्वलंत प्रश्न विषयी जाणीव निर्माण करून देतील असा विश्वास खासदार जाधव यांनी व्यक्त केला.यावेळी.शिवसेनेचे नेते गंगाप्रसाद आणेराव, सभापती पंढरीनाथ घुले आधी उपस्थित होते