परभणी,(प्रतिनिधी) परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे बांधकाम अद्याप सुरू न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात आज दिनांक 7 मार्च रोजी केली.त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. “सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल,” तसेच पुतळा बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे मंत्री सामंत यांनी आश्वासित केले.
यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना होती. २६ ऑगस्ट २०१९ रोजी परभणी महानगरपालिकेच्या बैठकीत ठराव क्र. २३२ संमत करण्यात आला, ज्यामध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्समधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा निश्चित करण्यात आली.परंतु पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे असल्यामुळे काम रखडले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शासनाने अनधिकृत बांधकामे हटवून जागा तात्काळ रिकामी करावी व निधी उपलब्ध करून पुतळ्याच्या कामाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.त्यावर उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. “सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल, पुतळ्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता शासन पडू देणार नाही असे मंत्री सामंत यांनी आश्वासित केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


