परभणी ( प्रतिनिधी)आज दि. ०८ मार्च जागतिक महिला दिन आजच्या दिवशी कर्तव्य करणा-या महिलांच्या सन्मान करण्याचा हा दिवस या निमित्याने पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतुन जिल्हयातील पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज रोजी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे पुर्ण दिवस हा महिला पोलीस स्टेशन म्हणुन साजरा करण्यात आला. त्यामध्ये पोलीस स्टेशन नानलपेठ चे प्रभारी अधिकारी म्हणुन महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती स्वाती कावळे, ठाणे अंमलदार कर्तव्यावर महिला पोलीस अंमलदार करुणा मालसमिन्दर, स्वागत कक्ष अधिकारी म्हणुन म.पो.अं. शामल धुरी, क्राईम राईटर म्हणुन म.पो.अं. शेख निशाद, गोपनिय शाखेचे प्रभारी म्हणुन म.पो.अं.सुनंदा साबणे, सी सी टी एन एस चे कामकाज म.पो.अं. अंजली हेंद्रे, हजेरी मेजर म्हणुन म.पो.अं.श्यामबाला टाकरस यांची तसेच पोलीस स्टेशनचे इतर सर्व कामकाज ठिकाणी महिला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात येवुन पोलीस स्टेशनचे कामकाज चालविण्यात आले.
तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतुन पोलीस स्टेशन नानलपेठ येथे महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या करीता त्यांनी कर्तव्य बजावत असतांना घ्यावयाची आरोग्याची काळजी व त्यांच्या इतर आरोग्य विषयक समस्या या विषयावर पोलीस स्टेशन नानलपेठ येथे डॉ. आशा पवन चांडक यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
पोलीस स्टेशन गंगाखेड येथे सहायक पोलीस अधीक्षक श्री ऋ षीकेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत महिला दक्षता समितीतील महिलांचा व पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अंमलदारांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन परीसरात पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
सोबतच जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर कार्यरत सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशनला ठाणे प्रभारी अधिकारी, ठाणे अंमलदार या सह इतर महत्वाचे कर्तव्याच्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणुक करण्यात आली होती.