परभणी (प्रतिनिधी,) स्वतःतील गुणवत्ता सिद्ध करताना संघर्ष हा अटळ आहे.हे ध्यानात घेत परभणी करांनी संघर्षावर मात करत गुणवंतांची मोठी फळी निर्माण केली आहे. कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतींनी ज्ञानसाधनेला कलागुणांची जोड देत. सदाचार, संकल्पाच्या आधारे कलेच्या माध्यमातून सुजाण समाज निर्माणा साठी योगदान द्यावे असे प्रतिपादन कमलोत्सव च्या उदघाटन प्रसंगी सारेगम फेम डॉ.अनिकेत सराफ यांनी केले.
कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी सांस्कृतिक विभाग आयोजित स्नेहसंमेलन कमलोत्सव -२०२५ च्या अध्यक्षस्थानी मा. हेमंतराव जामकर अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी.प्रमुख अतिथी ॲड. किरणराव सुभेदार उपाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी. प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, उदघाटक डॉ.अनिकेत सराफ आदी मान्यवरां सह व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. संगीता आवचार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रवींद्र इंगळे , डॉ पल्लवी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
कै .सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मा.हेमंतराव जामकर यांच्या हस्ते अनिकेत सराफ यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कमलोत्सवात विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत हे स्नेहसंमेलन यशस्वी करावे असे आवाहन प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी केले.
विद्यार्थिनींनी आपल्या अंगभूत कलागुणांच्या आधारे सानंद उत्साहात कमलोत्सव यशस्वी करावा. स्नेहसंमेलन ही आपल्यातील अंगभूत कलागुणांना चालना देणारी एक अभूतपूर्व संधी असते. संधी ओळखत आपण आपल्यातील कलावंताला जाग करत अनिकेत सराफ सारखे आनंदाची उधळण करणारे कलावंत व्हावे ,असे मत अध्यक्षीय समारोपात ॲड.किरणराव सुभेदार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. पल्लवी कुलकर्णी यांनी केले. डॉ .रवींद्र इंगळे यांनी आभार व्यक्त केले.


